AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar Take Oath as Dcm | सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, पहा शपथविधी सोहळा

Sunetra Pawar Take Oath as Dcm | सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, पहा शपथविधी सोहळा

| Updated on: Jan 31, 2026 | 5:52 PM
Share

अखेर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या असून, राजकारणाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बाब आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व आमदारांच्या एकमताने सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. गटनेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा खासदार या पदाचा राजीनामा दिला.

अजित पवार यांच्या विमान अपघातात निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर या सर्व प्रश्नांना पूर्णविराम मिळाला असून, सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील राजकीय दिशा ठरणार आहे.

Published on: Jan 31, 2026 05:52 PM