AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील वातावरणात मोठा बदल, थेट इशारा, दिवसभर राहणार धूसर वातावरण आणि…

Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस अशी स्थती सध्या बघायला मिळत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

राज्यातील वातावरणात मोठा बदल, थेट इशारा, दिवसभर राहणार धूसर वातावरण आणि...
Gray atmosphere
| Updated on: Feb 01, 2026 | 8:48 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी उकाडा अशी स्थिती आहे. उत्तरेकडे सध्या कडाक्याची थंडी आहे. मात्र, राज्यातील थंडी गायब झाली. 1 जानेवारी 2026 रोजी राज्यात अवकाळी पाऊस झाला. तेव्हापासून थंडी गायब झाली. डिसेंबर महिन्याप्रमाणेच जानेवारीतही थंडी राहण्याची शक्यता होती. आता फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली असून तापमानात चढउतार राहण्याची शक्यता आहे. अनेक भागात सध्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. पंजाब, जम्मू काश्मीर, हरियाणा, दिल्ली या भागात पाऊस बघायला मिळतोय. मुंबई आणि दिल्लीतील वायू प्रदूषण मोठा मुद्दा बनले आहे. मुंबईमध्ये सातत्याने प्रदूषणात वाढ होत आहे. दिवसा हवेत धुळेचे कण दिसत होते. वाढलेल्या वायू प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होताना दिसत आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी राहण्याची अंदाज आहे. राज्यात ढगाळ वातावरण सध्या बघायला मिळत आहे. राज्यात पावसाला पोषक असे वातावरण तयार होत आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ उतार सातत्याने बघायला मिळतोय. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 9.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. आज दिवसभर राज्यात धूसर वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यातून थंडी  जवळपास गेली आहे.

फेब्रुवारी महिन्यात ढगाळ वातावरणासह राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा वर्तवण्यात आला. जानेवारीप्रमाणेच फेब्रुवारी महिन्यातही वातावरणात मोठे बदल दिसतील. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असली तरीही राज्यात येणाऱ्या शीतलही कमी असल्याने थंडी फार काही नाहीये. सुरूवातीला सांगितले जात होते की, जानेवारी महिन्यातही राज्यात थंडी कायम राहिल. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही.

सतत हवामानातील बदल आणि त्यामध्येच वाढलेले वायू प्रदूषण यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. वाढलेल्या वायू प्रदूषणामुळे अनेकांना श्वसनाशी संबंधित आजार निर्माण होत आहेत. यासोबतच सर्दी, खोकला आणि ताप यांच्याही रूग्णात मोठी वाढ होत आहे. याकाळात नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं