
Divya Urinil Vati benefits: यूटीआयची समस्या सर्वसामान्य असली तर खूपच गंभीररुप धारण करु शकते. युटीआय तेव्हा होतो जेव्हा मूत्राशय किंवा मूत्रायश मार्ग बॅक्टेरियाने संक्रमित होते. युटीआय पसरण्यास ई-कोलाय बॅक्टेरिया जबाबदार असतो. अनेक कारणांनी युटीआय पसरतो. उदा. असुरक्षित लैंगिक संबंध, खूप काळ लघवी तुंबवणे. गर्भावस्था वा संक्रमित जागेवर लघवी केल्याने देखील युटीआय होऊ शकतो. या समस्येत डॉक्टर एंटीबायोटिक देतात. परंतू याच्यावर आयुर्वेदाकडे उत्तर आहे का ?
पतंजलीने दावा केला आहे की त्यांनी संशोधनातून एक औषध तयार केले आहे. जे युटीआय आणि एनीमिया सारख्या आजारावर नियंत्रण आणू शकते. पतंजलीच्या Divya Urinil Vati नावाचे हे औषध शोधले आहे. पतंजलीच्या मते Divya Urinil Vati एक सुरक्षित आणि हर्बल आयुर्वेदिक औषध आहे.खास करुन UTI आणि एनीमिया सारख्या समस्येत उपयोगी असते. यातील मुख्य घटक करमर्दा ( करौंदा ) नैसर्गिक रुपाने शरीराला संक्रमणापासून लढणे आणि रक्ताची कमी पूर्ण करण्यास मदत करते. हा औषध हर्बल असून यातून कोणताही साईड इफेक्ट होत नाही.या औषधाचे सेवन तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करणे गरजेचे आहे
आजकाल धावपळीच्या जीवन आणि चुकीच्या आहारशैलीने अनेक आरोग्याच्या समस्या समोर येत आहे, त्यातील दोन मोठ्या समस्या आहेत. एक म्हणजे मूत्र संक्रमण (UTI) आणि रक्ताची कमतरता (Anaemia). या दोन्ही आजारावर आयुर्वेदात उल्लेख आहे.यापैकी एक आहे Divya Urinil Vati औषध. हे हर्बल औषध असून आयुर्वेदिक घटकांपासून तयार केले जाते. त्यातील मुख्य घटक करमर्दा ( करवंदे -Carissa carandas ) एक्सट्रॅक्ट आहे.
Divya Urinil Vati चे सर्वात महत्वाचा Ingredients करमर्दा – करवंदे -Carissa carandas हा आहे.हे छोटेसे फल असून त्यात एंटीऑक्सीडेंट्स ,आयर्न आणि विटामिन्स पूरेपुर असते. आयुर्वेदात यास रक्तवर्धक, पचनास सहायक आणि शरीरास ताकद देणारे फळ मानले आहे. Divya Urinil Vati मूत्राशयाची समस्या आणि संक्रमण दूर करण्यासही मदत करते.
UTI (Urinary Tract Infection)
वारंवार लघवीला येतान जळजळ, दुखणे वा लघवी थांबून थांबून येणे हे युटीआयचे सर्वसामान्य लक्षण आहेत. करमर्दा एक्सट्रॅक्ट मुत्रनिलिकेला स्वच्छ करण्यास मदत करते. आणि इंफेक्शनच्या बॅक्टेरियांशी लढण्यास सहाय्य करते.
जेव्हा शरीरातील रक्ताची कमतरता होते. तेव्हा हिमोग्लोबिनची पातळी घसरत गेल्याने थकवा, कमजोरी आणि चक्कर येण्यासारख्या समस्या निर्माण होतात. करवंदातील आयर्न रक्ताची कमतरता पूर्ण करण्यास मदत करतात. हे औषध शरीरातील रक्त निर्मितीला मदत करते.
डोस (Dosage) – 1 वा 2 कॅप्सूल दिवसातून कोमट पाण्यासोबत घेणे
केव्हा घ्यायचे – जेवणाच्या आधी याचे सेवन करणे उत्तम मानले जाते.
सावधानता – डोस व्यक्तीची स्थिती आणि समस्येच्या गंभीरतेवर अवलंबून आहे. त्यामुळे दीर्घकाळ सेवन करण्याआधी आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
मुत्राशय आणि मूत्रनलिकेला आरोग्यपूर्ण राखण्यास मदत
वारंवार होणाऱ्या युटीआयपासून संरक्षण
शरीरातील रक्ताची कमतरता दूर करेत आणि हिमोग्लोबिन वाढवण्यास सहायक
थकवा, कमजोरी आणि चक्कर येण्यासारख्या समस्येत प्रभावी
नैसर्गिक आणि हर्बल असल्याने साईड इफेक्ट नसल्यात जमा
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या मातांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याच सेवन करु नये. ज्या लोकांना कोणत्या अन्य आजारावर औषधे सुरु आहेत. त्यांनी हे औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.लहान मुलांना देण्याआधी आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.