इलॉन मस्कला ‘त्या’ निर्णयावर होतोय पश्चाताप! ट्विटरमधून कर्मचारी कपात करणे माझी सर्वात मोठी चूक

ट्विटरचे सूत्र हाती घेतल्यानंतर इलॉन मस्क यांनी मोठ्याप्रमाणात कर्मचारी कपात केली, मात्र आता त्यांना या निर्णयाचा पच्छाताप होत आहे.

इलॉन मस्कला त्या निर्णयावर होतोय पश्चाताप! ट्विटरमधून कर्मचारी कपात करणे माझी सर्वात मोठी चूक
इलॉन मस्क
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 16, 2022 | 11:31 AM

सॅन फ्रान्सिस्को,  अखेर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे (Twitter) नवे बॉस इलॉन मस्क (Elon Musk) यांना त्यांची चूक कळली. त्यांच्या एका ट्विटमध्ये त्यांनी ट्विटरवर मोठ्या प्रमाणात टाळेबंदीचा निर्णय ही त्यांची सर्वात मोठी चूक असल्याचे मान्य केले. विशेष म्हणजे कंपनीची कमान सांभाळण्याबरोबरच येथे कार्यरत असलेल्या जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता.

मस्कने ट्विट करून मान्य केली चूक

<

/h2>
आपली चूक लक्षात आल्यावर इलॉन मस्कने ताज्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘जेव्हा मी चूक आहे हे कबूल करणे खूप महत्त्वाचे आहे आणि कर्मचाऱ्यांना काढून टाकणे ही माझी सर्वात मोठी चूक होती.’

दोन कर्मचाऱ्यांना बोलावले परत

आपली चूक मान्य करत, त्याने आणखी एका ट्विटमध्ये, ट्विटरमध्ये परत बोलावलेल्या दोन कर्मचाऱ्यांसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.  छाटणीची तलवार चालवल्यानंतर इलॉन मस्क यांनी अनेक कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्याची विनंती केली होती. दरम्यान त्यांनी ट्विटरच्या दोन कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले आहे. मस्क यांनी मंगळवारी सांगितले की, राहुल लिग्मा आणि डॅनियल जॉन्सन यांना काढून टाकण्याचा निर्णय चुकीचा आहे त्यामुळे मी त्यांना कंपनीत परत आणत आहे.

ट्विटरने अर्ध्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे

इलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर टाळेबंदीच्या आधी, ट्विटरमध्ये सुमारे 7,500 कर्मचारी काम करत होते, परंतु त्यापैकी सुमारे निम्मे कर्मचारी काढून टाकण्यात आले आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांना कंपनीत रात्रंदिवस काम करावे लागत आहे. कंपनीमध्ये ऑपरेशन क्लीन सुरू करून, मस्कने प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना काढून टाकले, त्यानंतर संचालक मंडळावरील सर्व संचालकांना काढून टाकले आणि नंतर लगेच कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. आता मात्र या निर्णयाचा इलॉन मस्क यांना पच्छाताप होतो आहे.