Twitter : ब्लू टिकसाठी काय मोजावे लागतील पैसे? मस्क यांचा निर्णय तरी काय..

Twitter : ब्लू टिकसाठी सशुल्क सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पण मस्क यांचे संकेत काय आहेत..

Twitter : ब्लू टिकसाठी काय मोजावे लागतील पैसे? मस्क यांचा निर्णय तरी काय..
ब्लू टिकसाठी मोजा पैसेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 3:53 PM

नवी दिल्ली : सोशल मीडीया प्लॅटफॉर्म ट्विटरने (Twitter) त्यांची पेड व्हेरिफेकशन सर्व्हिस म्हणजे ब्लू टिकसाठीची (Blue Tick) सशुल्क नोंदणी प्रक्रिया थांबवली आहे. एलॉन मस्कने तात्पुरती ही सशुल्क सेवेला (Paid Service) ब्रेक लावला आहे. पण आता एलॉन मस्कने (Elon Musk) ही सेवा पुन्हा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.

एलॉन मस्कने यासंबंधीचे ट्वीट (Twit) शनिवारी केले. त्यानुसार, ट्विटर ब्लू सेवेसाठी पुढील आठवड्याच्या शेवटी युझर्सला पैसे मोजावेच लागणार आहे. काही वादानंतर ब्लू सेवा काही काळासाठी खंडित करण्यात आली होती. पण ही सशुल्क सेवा लवकरच सुरु करण्यात येत आहे.

सशुल्क सेवेतंर्गत कोणताही युझर ट्विटरचे ब्लू टिक मिळवू शकतो. त्यासाठी युझरला 8 डॉलर म्हणजे 644 रुपये मोजावे लागतील. पण सोबतच त्यासाठी जीएसटीही मोजावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात ही सेवा महाग असू शकते.

हे सुद्धा वाचा

ट्विटरने नुकतीच सशुल्क सेवा सुरु केली होती. त्यानुसार, 8 डॉलर जमा करुन कोणत्याही वापरकर्त्याला त्याचे अकाऊंट व्हेरिफाई करता येत होते. पण ही योजना ट्विटरवरच उलटली. ट्विटरवर बनावट अकाऊंटची संख्या वाढली.

या बनावट खात्यावरुन उलटसूलट ट्विट करण्यात येऊ लागले. त्यामुळे अनेक कंपन्यांना त्याचा फटका बसला. तसेच समाज माध्यमावरील या ट्विटने मोठी खळबळ उडून दिली. अमेरिकेसारख्या देशात तर त्याचा मोठा दुष्परिणाम दिसून आला.

सर्व खेळखंडोबा सुरु झाल्यानंतर ट्विटरवर या सेवेसंबंधीचा दबाव वाढला. अनेक कंपन्यांचे बनावट खाती सक्रिय झाल्याचे लक्ष्यात आल्यानंतर ट्विटरने ही सशुल्क योजना काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला.

यापू्र्वी Blue Tick ही त्या व्यक्तीची, संस्थेची आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करणारी प्रक्रिया होती. ही टिक समाजातील पुढारी, सेलेब्रिटी, पत्रकार, नामावंत यांना देण्यात येत होते. पण ही सेवा निःशुल्क होती.

गुरुवारी मस्कने ट्विटर कर्मचाऱ्यांना या सेवेविषयीचा एक मेल पाठविला आहे. त्यात कंपनी सदस्य नोंदणी करणार नाही तर मोठ्या आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागेल असे म्हटले आहे. तसेच आता कंपनी कोणताही आर्थिक झटका सहन करु शकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.