EPFO Interest : 8 कोटी PF खातेदारांसाठी गुड न्यूज; खात्यात व्याज कधी जमा होणार? माहिती आली समोर

EPFO : तुमच्या ईपीएफओ खात्यात लवकरच व्याजाची रक्कम जमा होईल. याबाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे.

EPFO Interest : 8 कोटी PF खातेदारांसाठी गुड न्यूज; खात्यात व्याज कधी जमा होणार? माहिती आली समोर
| Updated on: Jul 07, 2026 | 7:29 PM

8 कोटी PF खातेदारांसाठी खुशखबर हाती आली आहे. EPFO सदस्यांच्या पीएफ खात्यात वाढ होणार आहे. ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात 8.25 टक्के जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सिस्टम अपग्रेडमुळे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया अधिक जलद होण्याची शक्यता आहे. याबाबत सर्व कार्यालयांना सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच पीएफ व्याज खात्यात जमा होईल.

EPFO ने प्रादेशिक कार्यालयांना पीएफ व्याजाची रक्कम खात्यात जमा करण्याचे निर्देश दिलेत. तसेच योजनेच्या कलम 60(1) अंतर्गत या आर्थिक वर्षासाठी ईपीएफओ योजनेच्या प्रत्येक सदस्यांच्या खात्यात निश्चित दराने व्याजाची रक्कम जमा करण्याचे केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.

व्याजाची रक्कम जलद गतीने होणार ट्रान्सफर 

मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्तीचा फंड मॅनेजरने मागील आठवड्यात डेटाबेसचं एकत्रीकरण आणि सॉफ्टवेअर अपग्रेड केलंय. त्यामळे लाखो सदस्यांच्या खात्यांमध्ये पीएफ व्याजाची रक्कम आधीपेक्षा अधिक जलद गतीने ट्रान्सफर होईल. ही प्रक्रिया आधीसारखी राहणार नाही, यात बदल पाहायला मिळतील. या आधी सर्व सदस्यांना व्याजाचे पैसे मिळण्यास एक ते दोन महिन्याचा कालावधी लागायचा.

अर्थ मंत्रालयाने जूनमध्ये दिली होती मंजुरी  

ईपीएफओ सदस्य हे वर्षाच्या सुरुवातीपासून पीएफ खात्यात व्याजाची रक्कम जमा होण्याची प्रतीक्षा करत होते. या वर्षी मार्च महिन्यात ईपीएफओच्या मंडळाने 8 कोटींहून अधिक सदस्यांसाठी चालू आर्थिक वर्षात 8.25 टक्के व्याजदाराला मंजुरी दिली होती. सलग तिसऱ्या वर्षी व्याजदर कायम ठेवला आहे. ईपीएफओकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जातो. त्यानंतर अर्थ मंत्रालयाने जूनमध्ये व्याजदराला मंजुरी दिली होती.

खात्यातील शिल्लक रक्कम कशी जाणून घ्याल? 

तुमच्या ईपीएफ खात्यात शिल्लक रक्कम अनेक मार्गांनी तपासू शकता. तुमचा UAN आणि मोबाईल नंबर ईपीएफओकडे नोंदणीकृत असेल, तर तुम्ही फक्त एक एसएमएस पाठवून तुमच्या खात्याची माहिती जाणून घेऊ शकता. तसेच तुम्ही उमंग अॅप, ईपीएफओ पोर्टल आणि मिस्ड कॉलद्वारे देखील रक्कम जाणून घेऊ शकता.

Follow Us