AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO Rules: कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता!EPFO ने बदलला नियम, आता काढा कारण न देता पीएफची संपूर्ण रक्कम

EPFO Rules PF Withdrawal: ईपीएफओने पीएफ काढण्याचे नियम अधिक सोपा केला आहे. त्यामुळे विशेष परिस्थितीत आता कोणतेही कारण न देता 100% पीएफ काढता येणार आहे. हा बदल नोकरदार वर्गासाठी दिलासा देणारा आहे. काय आहे हा निर्णय?

EPFO Rules: कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता!EPFO ने बदलला नियम, आता काढा कारण न देता पीएफची संपूर्ण रक्कम
ईपीएफओ संपूर्ण पीएफ रक्कमImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 13, 2026 | 1:28 PM
Share

EPFO Rules PF Withdrawal: केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. ईपीएफओने पीएफ काढण्याचे (PF Withdrawal) आणि दाव्यासंबंधीचे नियम सुटसुटीत केले आहे. नवीन बदलानुसार पीएफ खातेदारांना काही खास आणि विशेष परिस्थितींमध्ये कोणतेही कारण न देता पीएफची सर्व रक्कम काढता येईल. सरकारच्या या नवीन बदलामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या नवीन नियमामुळे पीएफ खातेदारांना अडचणीच्यावेळी 100 टक्के रक्कम काढता येईल.

काय होता नियम आणि अडचण?

जुन्या प्रक्रियेनुसार, जर एखादा कर्मचारी दीर्घ काळापर्यंत बेरोजगार असेल अथवा कंपनी बंद झालेली असेल. एखादी नैसर्गिक संकट असेल तर पीएफची रक्कम काढण्यासाठी त्याला अगोदर कारण द्यावे लागत होते. त्यासाठीचे कागदपत्रंही जोडावे लागत होते. त्यानंतर त्याला संपूर्ण पीएफ रक्कम काढण्याची मुभा देण्यात येत होती. तर अनेकदा दिलेले कारण ईपीएफओचे नियम यांचा ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा दावा फेटाळण्यात येत होता. तर पैशाची तंगी असतानाही त्याला पीएफचा लाभ मिळत नव्हता. पण आता नियमात बदल करण्यात आला आहे.

नवीन नियमामुळे काय बदल?

सरकारी अधिसूचनेनुसार, EPFO ने आता विशेष परिस्थितीत अशा श्रेणीतंर्गत पैसे काढण्यासाठीच्या कारणाची अट हटवली आहे. आंशिक रुपाने ही अट दूर केली आहे. जर तुम्ही नियमानुसार, पीएफची पूर्ण रक्कम काढण्यासाठी अर्ज केला असेल आणि त्यासंबंधीचे कारण एकदम स्पष्ट असेल तर तुम्हाला अतिरिक्त कारण देण्याची ना स्पष्टीकरण देण्याची अजिबात गरज नाही. या श्रेणीतंर्गत तुमचा क्लेम, पैसा काढण्याचा दावा नाकारण्यात येणार नाही. प्रक्रियेनंतर पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील.

100% पैसे काढण्यासाठी काय अट?

नियमातील हा बदल आणि 100 टक्के पीएफ काढण्याची सवलत काही विशेष परिस्थितीसाठीच लागू आहे.

जर तुमची कंपनी 15 दिवसांपेक्षा अधिक काळ बंद असेल अथवा ताळेबंदी लागू असेल. कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसेल. कंपनी सलग 6 महिने बंद पडलेली असेल.

कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले असेल. कामगार कपातीत कर्मचाऱ्याची नोकरी गेली असेल. त्याने या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले असेल.

स्वतःसाठी अथवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या उपचारासाठी पूर्ण पैसे काढले जाऊ शकतात. अर्थात यासाठी मात्र कंपनी आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्रमाणपत्राची गरज आहे.

सामान्य परिस्थिती किती काढता येईल PF?

संपूर्ण पीएफ काढण्यासाठी विशिष्ट कारण हवे. पण कोणत्याही व्यक्तीला केव्हाही त्यांच्या मर्जीने पीएफची रक्कम काढता येणार नाही. पैशांची गरज असेल तेव्हा तुम्हाला विना कागदपत्रे केव्हाही तुमच्या एकूण जमा रक्कमेपैकी 75% रक्कम काढता येईल. तर संपूर्ण पीएफ रक्कम काढण्यासाठी काही खास परिस्थिती असणे आवश्यक आहे. पण त्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार