Billionaire Top Gainer : नशीब पालटलं की! लुझर ठरला विनर, पुन्हा अब्जाधीश नंबर वन

| Updated on: Feb 28, 2023 | 11:36 AM

Billionaire Top Gainer : वेळ तिचे महत्व अधोरेखित करतेच. या अब्जाधीशाला गेल्या वर्षाने पार पिडले. त्याची श्रीमंत झपाट्याने घटली. त्याच्या निर्णयाची जगभर खिल्ली उडवली गेली. त्याची यथेच्छ टिंगल टवाळी झाली, आता तर त्याचे नाव तुम्हाला ही कळले असेलच की..

Billionaire Top Gainer : नशीब पालटलं की! लुझर ठरला विनर, पुन्हा अब्जाधीश नंबर वन
Follow us on

नवी दिल्ली : ‘समय बडा बलवान भैया’, असे आपण सगळंच म्हणतो. वेळ कोणावर सांगून येत नाही. ती राजाला रंक आणि रंकाला राजा बनवते. ‘समय का खेल बडा निराला’, असे म्हणतात. वर्ष 2022 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत (Richest List) भारताचे उद्योगपती, अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) झपाट्याने पुढे आले. रॉकेटच्या गतीने अदानी यांनी झेप घेतली होती. पण या वर्षांत फासे पलटले. हिंडनबर्ग रिपोर्टच्या अहवालानंतर अदानींना मोठा झटका बसला. 2023 मध्ये सर्वात झपाट्याने त्यांची संपत्ती कमी झाली. आता तर श्रीमंतांच्या टॉप-30 यादीतूनही ते बाहेर फेकले गेले.  मुकेश अंबानी यांच्याही संपत्तीत घट झाली.  वेळ तिचे महत्व अधोरेखित करतेच. या अब्जाधीशाला गेल्या वर्षाने पार पिडले. त्याची श्रीमंत झपाट्याने घटली. त्याच्या निर्णयाची जगभर खिल्ली उडवली गेली. त्याची यथेच्छ टिंगल टवाळी झाली, आता तर त्याचे नाव तुम्हाला ही कळले असेलच की..

अमेरिकन शेअर बाजारात टेस्लाच्या (Tesla) शेअरने अचानक उसळी घेतली. या उसळीने पुन्हा मालक एलन मस्क यांचे नशीब पालटवले. अब्जाधीशांच्या यादीत त्यांनी पुन्हा पहिला क्रमांक गाठला. जगातील अब्जाधीशांच्या यादीत त्यांनी पहिले स्थान पटकावले आहेच. पण ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये कमाईत त्यांनी सर्वांनाच पिछाडीवर फेकले. यावर्षी त्यांच्या संपत्तीत एकूण 50.1 अब्ज डॉलरची भर पडली आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी ट्विटर खरेदीचा निर्णय एलॉन मस्क यांच्या अंगलट आला. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयाची यथेच्छ टिंगल झाली. त्यांचे निर्णय अनेकांना रुचले नाहीत. त्यातच त्यांनी नोकरकपात आणि ट्विटरच्या कार्यालयांना धडाधड कुलूप लागले. कार्यालयातील वस्तूंचा लिलाव करुन त्यातून भाडे देण्याची वेळ मस्क यांच्यावर आली. एका बैठकीत कर्मचाऱ्यांनी सामूहिक राजीनाम देऊन ट्विटरसह मस्क यांना जागा दाखवून दिली होती.

गेले वर्षे मस्क यांच्यासाठी कसोटीचे ठरले. त्यांच्या ट्विटरकांडामुळे त्यांच्या संपत्तीवरही मोठा परिणाम झाला. ते अब्जाधीशांच्या यादीबाहेर फेकले गेले नाही. पण त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण झाली. पण यंदा त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. 187 अब्ज डॉलरसह ते पहिल्या स्थानी होते. तर बर्नार्ड अर्नाल्ट हे 185 अब्ज डॉलरसह दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी यंदा आतापर्यंत 23.3 अब्ज डॉलरची कमाई केली आहे.

हिंडनबर्गच्या अहवालानंतर आलेल्या वादळात गौतम अदानी यांचा संपत्तीचा डोलारा सातत्याने कमी होत आहे. यावर्षी आतापर्यंत अदानी यांनी 82 अब्ज डॉलर गमावले आहेत. यातील 90 हिस्सा त्यांनी 24 जानेवारी 2023 रोजीनंतर गमावले आहे. आता अदानी यांची एकूण संपत्ती 124 अब्ज डॉलरने घसरुन 37.7 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. वेगाने संपत्तीत घसरण होणाऱ्या अब्जाधीशांमध्ये पहिल्या क्रमांकावर गौतम अदानी आहे तर दुसऱ्या स्थानावर रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे आहेत.