AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कच्च्या तेलाच्या दरात घसरण; भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?

जागतिक बाजारामध्ये पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर तीन टक्क्यांनी घसरून 78.89 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत.

कच्च्या तेलाच्या दरात घसरण; भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार?
पेट्रोल-डिझेल
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 11:59 AM
Share

नवी दिल्ली : जागतिक बाजारामध्ये पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर तीन टक्क्यांनी घसरून 78.89 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. कोरोनाचे सावट कमी झाल्याने जगतीक स्थरावर कच्च्या तेलाचे उत्पादन वाढले आहे. याचा परिणाम म्हणेज तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे दर घटल्याने येणाऱ्या काळात भारतामध्ये पेट्रोल, डिझेल स्वस्त होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

साधारणपणे कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल, डिझेलचे दर अवलंबून असात. कच्च्या तेलाचे दर वाढले की पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात आणि दर कमी झाले तर इंधनाचे दर देखील कमी होतात. मात्र आज कच्चा तेलाच्या किमतीमध्ये तीन टक्क्यांची घट होऊन देखील भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 103.97 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये इतका आहे. तर मुंबईत अनुक्रमे पेट्रोल आणि डिझेलचा दर 109.98 आणि 94.14 रुपये प्रति लिटर आहे.

उत्पादन शुल्क कपातीचा निर्णय 

गेल्या चार नोव्हेंबरला केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. उत्पादन शुल्क कमी करण्यात आल्याने पेट्रोलचे दर प्रति लिटर मागे 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त झाले होते. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता. केंद्रनंतर अनेक राज्यांनी देखील व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्याने पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त झाले आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या 

पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद; ‘या’ तारखांना असणार सुटी

‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना बनवले कोट्याधीश; 20 वर्षांमध्ये शेअर्सच्या किमतीत 650 टक्क्यांची वाढ

Follow Us
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...