FASTag चा खेळ संपला की राव; आता Satellite Toll चा जमाना, नितीन गडकरी यांची काय मोठी घोषणा

Satellite Toll Collection : टोल प्लाझावर आता लांबच लांब रांगा लागण्याची गरज उरणार नाही. आता फास्टॅग नाही तर सॅटेलाईट आधारीत टोल सिस्टिम सुरू होणार आहे. कारची ओळख पटवून कर जमा करण्यात येणार आहे. सुरुवातीला फास्टॅग आणि आता सॅटेलाईट सिस्टिम दोन्ही असतील.

FASTag चा खेळ संपला की राव; आता Satellite Toll चा जमाना, नितीन गडकरी यांची काय मोठी घोषणा
सॅटेलाईट टोल कलेक्शन
| Updated on: Sep 12, 2024 | 12:14 PM

फास्टॅग असले तरी अनेक टोल नाक्यांवर गर्दी दिसते. पूर्वीपेक्षा ही रांग लांब नाही इतकेच ते काय सूख आहे. फास्टॅगमुळे या टोल वसुलीला वेग आला असे म्हणता येईल. पण आता काही दिवसांनी टोल नाक्यावर थांबण्याची गरजच उरणार नाही. तुम्ही टोल नाक्यावरुन कार दामटवून नेली तरी तुमच्या बँक खात्यातून टोल वसूल करण्यात येणार आहे. आता सॅटेलाईट आधारीत टोल सिस्टिम सुरू होणार आहे. यामध्ये फास्टॅग स्कॅन करण्याची गरज नाही. तर सॅटेलाईटच्या मदतीने कारची ओळख पट‍वण्यात येईल. त्यानंतर संबंधित खातेदाराच्या बँक खात्यातून टोल वसूल करण्यात येईल.

लागलीच फास्टॅग बंद नाही

याचा अर्थ लागलीच फास्टॅग बंद करण्यात येईल असा नाही. सुरूवातीला सॅटेलाईट सिस्टिम योग्य पद्धतीने काम करेपर्यंत या दोन्ही पद्धती सुरू असतील. त्यानंतर हळूहळू फास्टॅगवरुन सॅटेलाईट सिस्टिमकडे टोल वसूली हस्तांतरीत करण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग शुल्क अधिनियम 2008 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. या संशोधनानंतर आता इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनचा पण समावेश करण्यात आला आहे. सॅटेलाईट टोल कनेक्शनसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सॅटेलाईट प्रणाली कशी काम करणार?

सॅटेलाईट आधारीत टोल वसूली प्रणालीमध्ये कार वा इतर वाहनांना टोल प्लाझावर उभं राहण्याची गरज नाही. त्यामुळे टोल नाक्यावर गर्दी होणार नाही. वाहन थांबविण्याची गरज नसेल. या ठिकाणाहून गेल्यावर सॅटेलाईट प्रणाली कारची ओळख पटवेल. त्याआधारे कार मालकाच्या खात्यातून रक्कम आपोआप कपात होईल. फास्टॅग बंद करण्याची सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.आता काही दिवसांनी टोल नाक्यावर थांबण्याची गरजच उरणार नाही. तुम्ही टोल नाक्यावरुन कार दामटवून नेली तरी तुमच्या बँक खात्यातून टोल वसूल करण्यात येणार आहे. आता सॅटेलाईट आधारीत टोल सिस्टिम सुरू होणार आहे. यामध्ये फास्टॅग स्कॅन करण्याची गरज नाही. तर सॅटेलाईटच्या मदतीने कारची ओळख पट‍वण्यात येईल. त्यानंतर संबंधित खातेदाराच्या बँक खात्यातून टोल वसूल करण्यात येईल.