56th GST Council Meeting Updates : जीएसटीतून गुजरातच्या खाकऱ्यासह भुजियाला मोठा दिलासा, झिरो टक्के..

56th GST Council Meeting :जीएसटी संदर्भात महत्वाची बैठक झाली असून काही मोठे निर्णय या बैठकीत झाली आहेत. आता दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी काढण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. हा सर्वसामान्यांना मोठा दिलासाच म्हणावा लागेल.

56th GST Council Meeting Updates : जीएसटीतून गुजरातच्या खाकऱ्यासह भुजियाला मोठा दिलासा, झिरो टक्के..
Nirmala Sitharaman
| Updated on: Sep 04, 2025 | 10:24 AM

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी जीएसटी काउंसिलची 56वी बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना दिला मिळाला आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंवरील जीएसटी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील काही दिवसांमध्ये जर आपण बघितले तर जीएसटीचा कहर संपूर्ण देशात सुरू आहे. प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टीवर जीएसटी हा लागू करण्यात आला. जीएसटी लागू करण्यात आल्याने वस्तूंच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. आता त्यामधून काही प्रमाणात दिला देण्यात आला असून घरगुती वापरामधील काही वस्तूंचा झिरो टक्के जीएसटी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

महत्वाच्या गोष्टींवरून जीएसटी काढताना गुजरातला झुकते माप देण्यात आल्याचे दिसतंय. गुजरातचा जगप्रसिद्ध खाकऱ्यावर 0 टक्के जीएसटी असणार आहे. आता यामुळे खाकऱ्याच्या किंमतीत मोठी घट होईल. कमी किंमतीमध्ये तुम्ही खाकऱ्याची खरेदी करू शकता. यासोबतच भुजियावरील मोठा जीएसटी काढून त्याला 5 टक्के जीएसटीच्या रांगेत आणून बसवले आहे. खाकरा आणि भुजिया या दोन्ही वस्तू गुजरातमधील प्रसिद्ध आहेत.

फक्त खाकरा आणि भुजियाच नाही तर दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱे साबण, शॅम्पू याच्यावरीलही जीएसटी हा कमी करण्यात आलाय. मात्र, तुम्हाला चपातीवरही जीएसटी हा भरावा लागणार आहे. पिझ्झावरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. दैनंदिन जीवनातील वस्तूंवरील जीएसटी कमी झाल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही वर्षात सातत्याने टॅक्स वाढवला जात असल्याची लोकांमध्ये ओरड ही बघायला मिळतंय.

जीएसटी लागू झाल्यापासून घरात येणारी प्रत्येक गोष्ट महाग झालीये. हेच नाही तर दिवसेंदिवस महागाई वाढताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणात जीएसटी संदर्भात अत्यंत मोठे विधान केले होते. त्यांनी काही वस्तूंवरील जीएसटी कमी होण्याचे संकेत दिले होते. शेवटी आता लोकांना दिलासा देत काही वस्तूंवर झिरो टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय हा सरकारकडून घेण्यात आला आहे. अजूनही काही मोठे निर्णय जीएसटी संदर्भात होणार का? याकडे सर्वांच्या नजरा आहेत.