SBI, PNB, ICICI ‘या’ बँकांची पैसे काढण्याची मर्यादा जाणून घ्या, नेमकी मर्यादा किती?

| Updated on: Sep 01, 2021 | 7:29 AM

या दोन बँकांव्यतिरिक्त खासगी बँक ICICI आपल्या ग्राहकांना गृह शाखेतून 1 लाख रुपये काढण्याची परवानगी देते. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने नुकतेच चेक आणि इतर शाखांमधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे.

SBI, PNB, ICICI या बँकांची पैसे काढण्याची मर्यादा जाणून घ्या, नेमकी मर्यादा किती?
ATM Cash Withdrawal
Follow us on

नवी दिल्लीः देशातील वेगवेगळ्या बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. स्टेट बँक SBI चे ग्राहक एका दिवसात इतर शाखांमधून फक्त 25,000 रुपये काढू शकतात. त्याचप्रमाणे PNB क्लासिक डेबिट कार्डधारक एका दिवसात 25,000 रुपये काढू शकतात. या दोन बँकांव्यतिरिक्त खासगी बँक ICICI आपल्या ग्राहकांना गृह शाखेतून 1 लाख रुपये काढण्याची परवानगी देते. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने नुकतेच चेक आणि इतर शाखांमधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे.

ब्रँचमधून 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकता

नवीन नियमानुसार स्टेट बँकेचे ग्राहक नसलेल्या ब्रँचमधून 25,000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात. बचत खात्याच्या पासबुकवर असे पैसे काढता येतात. चेक वापरून 1 लाख रुपये काढता येतात. थर्ड पार्टीसाठी चेकमधून पैसे काढण्याची मर्यादा 50,000 रुपये निश्चित केलीय.

पंजाब नॅशनल बँकेकडून ग्राहकांना तीन प्रकारचे डेबिट कार्ड ऑफर

पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना तीन प्रकारचे डेबिट कार्ड ऑफर करते. प्लॅटिनम, क्लासिक आणि गोल्ड कार्ड या श्रेणीत येतात. पीएबीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, पीएनबी प्लॅटिनम डेबिट कार्ड धारकासाठी एका दिवसात पैसे काढण्याची मर्यादा 50,000 रुपये निश्चित केलीय. एकवेळ रोख रक्कम काढण्याची मर्यादा 20,000 रुपये आणि ईओएस किंवा पीओएस मर्यादा 1.25 लाख रुपये ठेवण्यात आलीय.

कोणत्या बँकेचा नियम काय?

एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून तुम्ही एका दिवसात 10,000 रुपये काढू शकता. ही मर्यादा एचडीएफसी बँकेच्या एटीएम आणि एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांसाठी आहे. डेबिट कार्डच्या सहाय्याने तुम्ही 25,000 रुपये काढू शकता. पैसे काढण्याची मर्यादा हे कोणत्या डेबिट कार्डवर आहे यावर देखील अवलंबून असते. तुम्ही बँकेच्या कामकाजाच्या वेळेस कोणत्याही एचडीएफसी बँकेच्या शाखेला भेट देऊन पैसे काढण्याची स्लिप किंवा चेकमधून पैसे काढू शकता. तुम्ही शाखेत डिपॉझिट स्लिपद्वारे पैसे जमा करू शकता.

1 लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम काढण्याची मर्यादा

ICICI बँकेने ग्राहकांसाठी गृह शाखेतून 1 लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम काढण्याची मर्यादा निश्चित केली आहे. हा नियम प्रत्येक ग्राहकासाठी दरमहा आहे. जर तुम्ही बँकेच्या दुसऱ्या शाखेतून पैसे काढले तर एका दिवसात 25,000 काढल्यावर कोणतेही अतिरिक्त शुल्क लागणार नाही. कोणत्याही थर्ड पार्टी व्यवहारासाठी ही मर्यादा प्रति दिन 25,000 रुपये निश्चित केली गेलीय.

आरबीआयचे निर्देश

अलीकडेच रिझर्व्ह बँकेने बँकांचे इंटरचेंज शुल्क वाढवले ​​होते. यासह खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना पैसे काढण्यासाठी शुल्क वाढवण्याची परवानगी देण्यात आली. एटीएममधून पैसे काढण्यासाठी हा नियम करण्यात आला. यासोबतच डेबिट आणि क्रेडिट कार्डचे शुल्कही वाढवण्यास परवानगी देण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर, एटीएममधून पैसे काढण्यावरील इंटरचेंज 2 रुपये जूनमध्ये रिझर्व्ह बँकेने इंटरचेंज फी 15 रुपयांवरून 17 रुपये केली. बिगर आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज फी 5 वरून 6 पर्यंत वाढवली. रकमेवर प्रक्रिया करण्यासाठी बँकेकडून त्याच्या ग्राहकाकडून हे शुल्क आकारले जाते. डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहारांसाठी हे शुल्क आकारले जाते.

संबंधित बातम्या

Gold Rate Today : सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त, किंमत खूप कमी, वाचा ताजे दर

Gold Price Today: सोने 400 रुपयांनी महागले, चांदीचे भावही वाढले, पटापट तपासा सोन्याची आजची किंमत

Find out the withdrawal limit of SBI, PNB, ICICI, what is the limit?