
सोने आणि चांदीच्या दागिन्याचे दर आकाशाला भिडले असून गुंतवणूकांची नजर लागली आहे. जानेवारी 2026 च्या पहिल्याच दोन आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातू नवे रेकॉर्ड केला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज ( MCX ) वर सोने सुमारे 1.40 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास पोहचले आहे. तर चांदी 2.60 लाख रुपये प्रति किलोच्यावर पोहचली आहे.
सोने आणि चांदीत इतक्या प्रचंड दराने वाढ होत असल्याने सर्वसामान्याच्या मनात आता नफा कमवण्याची हीच संधी असल्याचे वाटत आहे.. ? काही जण आणखी दर वाढीची वाट पाहात आहेत. आता सोने आणि चांदीच्या दरात नव्याने गुंतवणूकीचा विचार करीत आहात तर आता सोने आणि चांदी खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का ? असा सवाल केला जात आहे.
एक्सपर्ट्सच्या मते सोने आणि चांदीच्या दरवाढी मागे जगातील वाढता तणाव आहे. अमेरिका, इराण, व्हेनेझुएला, चीन आणि जपानशी संबंधित घटनांनी ग्लोबल मार्केटमध्ये भीती आणि अनिश्चितता वाढली आहे. जेव्हा जगात अस्थिरता वाढत असते. तेव्हा गुंतवणूक शेअर आणि रिस्क्री एसेट्सचे पैसे काढून सुरक्षित जागी गुंतवणूक करण्याची प्रवृत्ती वाढते. याशिवाय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावतीने इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर भरमसाठ टॅरिफची धमकी दिल्याने बाजारात चिंता वाढली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या स्वातंत्र्यासंदर्भात उठणाऱ्या प्रश्नांनी गुंतवणूकदारांना आणखी सर्तक केले आहे.
मोठे ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या अहवालानुसार साल 2026 मध्ये सोन्याची स्थिती अस्थिर राहाणार आहे. त्यात अनेक बदल आणि चढ-उताराने भरले आहे. अशा वातावरणात सोने आणि चांदी महत्वाचे आहे. रिपोर्टनुसार सेंट्रल बँका सतत सोन्याची खरेदी करत आहेत. खाणीतून पुरवठा मर्यादित होत आहे. आणि जुन्या सोन्याची विक्री देखील जास्त वाढत नाहीए, या कारणाने सोन्या-चांदी पोर्टफोलिओ मजबूत सहारा बनू शकते.
इकॉनॉमिक्स रिपोर्टमध्ये आनंद राठी शेअर्सच्या कमोडिटी एक्सपर्ट मनीष शर्मा यांच्या मते सध्या जागतिक तणाव कमी होण्याचे काहीही संकेत नाहीत. यामुळे नजिकच्या भविष्यात सोने आणि चांदीच्या किंमती चढ्याच राहू शकतात. मात्र, सध्याच्या गुंतवणूकदारांना ते सल्ला देत आहेत की संपूर्ण पैसा काढण्याऐवजी 40 ते 50 टक्क्यांपर्यंत नफा बुक करणे समजदारी होऊ शकते. यामुळे लाभ सुरक्षित राहिल आणि जर किंमती आणखी वाढल्या तर गुंतवणूक कायम राहिल. नव्या गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला आहे की एकसाथ मोठी रक्कम गुंतवणूक करु नये.
गुंतवणूकदारांनी हळूहळू, छोट्या भागात SIP सारख्या पद्धतीने गुंतवणूक करावी, म्हणजे जोखीम कमी होऊ शकते.सोने आणि चांदी आता ही रेकॉर्डस्तरावर पोहचली आहे. परंतू सध्याची भाववाढ भीती आणि अस्थिरतेमुळे निर्माण झाली आहे.