AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सोने 12,000 रुपयांनी स्वस्त होणार? तज्ज्ञांनी सांगितले सोन्याच्या घसरणी मागील कारण

जागतिक घडामोडींचा परिणाम सोन्याच्या किमतीवर होऊ शकतो. सोन्याच्या किमतीत घसरण होऊ शकते. एप्रिल-मे महिन्यात सोन्यात १० टक्के सुधारणा दिसून आली. परंतु येत्या काळात सध्याच्या दरानुसार १२,००० रुपयांची घसरण दिसून येऊ शकते.

काय सोने 12,000 रुपयांनी स्वस्त होणार? तज्ज्ञांनी सांगितले सोन्याच्या घसरणी मागील कारण
gold
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 03, 2025 | 7:35 AM
Share

गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमतीत बरेच चढ-उतार होत आले आहेत. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर १ लाख रुपयांच्या पलीकडे गेले होते. त्यानंतर या दरात घसरण दिसून आली. सध्या सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅमसाठी ९७,००० रुपयांवर आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोन्याची किंमत सुमारे १२,००० रुपयांनी घसरण होऊ शकते. सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅमसाठी ८० ते ८५ हजारांच्या दरम्यान राहू शकतात.

केडिया अ‍ॅडव्हायझरीजचे संचालक अजय सुरेश केडिया यांनी सांगितले की, सध्या सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होत असली तरी येत्या काळात सोन्याचे दर कमी होती. एप्रिल-मे महिन्यात सोन्यात १० टक्के सुधारणा दिसून आली. परंतु येत्या काळात सध्याच्या दरानुसार १२,००० रुपयांची घसरण दिसून येऊ शकते. सोने ८० ते ८५ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते. भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर सोन्याचे दर कमी झाले होते. सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम मागे २००० रुपयांची घसरण झाली होती. आता येत्या काळात सोने आणखी स्वस्त होऊ शकते. यामागे अनेक कारणे आहेत. त्यामागे काही कारणे आहेत.

यामुळे सोन्याची किंमत कमी होणार

  1. जेव्हा सोन्याचे भाव वाढले असतात तेव्हा बाजारात नफा कमवला जातो. सोन्याच्या ईटीएफमध्ये वाढ दिसून आली. यामुळे नफा कमवण्यासाठी सोन्याची विक्री होईल. त्यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव दिसून येईल.
  2. सोन्याच्या किमतीवर जागतिक घडामोडींचा परिणाम होत असतात. जेव्हा जेव्हा जागतिक पातळीवर परिस्थिती तणावाची असते तेव्हा तेव्हा सोन्याच्या किमतीत वाढ दिसते. परंतु सध्या अमेरिकेकडून टॅरिफसंदर्भात भूमिका थोडी सौम्य करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी झाला आहे. यामुळे सोन्याच्या दरात घसरण होऊ शकते.
  3. आरबीआयची मॉनेटरी पॉलिसी सोन्याच्या दरात महत्वाची भूमिका बजावत असते. आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसीच्या समितीची बैठक सहा जून रोजी होत आहे. या बैठकीत आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होऊ शकतो. किंमतीत घसरण होऊ शकते.
  4. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत फेडवर व्याजदर कमी करण्यासाठी दबाव आणत आहेत. जर फेडने दर कमी केले तर सोन्याला आधार मिळेल. परंतु सध्या फेड व्याजदर कमी करण्याची शक्यता कमी आहे. व्याजदारात कपाती झाली तर सोन्याची किमत कमी होऊ शकते.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?