Dry Drought: दुष्काळ जाहीर पण प्रत्यक्ष मदत केव्हा? मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्याने वाढवली शेतकर्यांची चिंता, उपायासाठी किती वेळ लागणार?
Dry Drought in Maharashtra: राज्य सरकारने 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. आता युद्ध पातळीवर, तात्काळ पंचनामे, उपाययोजना सुरू होण्याचा दावा करण्यात आला. पण प्रत्यक्षात मदत केव्हा पोहचेल याचं खरं उत्तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले.

Babasaheb Patil on Dry Drought: राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड आणि मुखेड वगळता मराठवाड्यातील 74 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. दुष्काळी भागात बारा उपाययोजना आणि सवलती लागू केल्याचे काल टीव्ही 9 मराठीशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. युद्ध पातळीवर पंचनामे आणि उपाय योजना लागू होण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असा शब्द त्यांनी दिला. राज्यात दुष्काळ जाहीर झाला. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी सुरू होणार याची चर्चा सुरू असतानाच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी प्रत्यक्ष मदत केव्हा पोहचेल याचं खरं उत्तर दिलं आहे.
दुष्काळग्रस्त भागातील सवलती आणि उपाय योजना
कर्ज वसुलीला स्थगिती: शेतीशी संबंधित कर्जांच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे
कर्जपुनर्गठन: शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येईल
महसूल सवलत: जमीन महसुलात सूट देण्यात येईल
वीज सवलत: कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सवलत देण्यात येईल. वीज जोडणी खंडीत करण्यात येणार नाही
परीक्षा शुल्क माफी: दुष्काळग्रस्त भागातील शाळा आणि महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ करण्यात येतील
पाणी आणि चारा पुरवठा: जनावरांना पाणी आणि चारा पुरवठा. तर नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवण्यात येईल
मदतीसाठी लागणार वेळ
राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असला आणि युद्धपातळीवर मदत पोहचवण्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी सवलती आणि उपाय योजना तात्काळ मिळणार नाही हे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्यावरून समोर आले आहे. परभणीत माध्यमांशी बोलताना त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. राज्यात भीषण दुष्काळ परिस्थिती आत्तापर्यंत कधी असा दुष्काळ बघितला नाही, 1972 चा दुष्काळ वेगळा होता मात्र यावर्षी सोयाबीन कापूस आणि उसाच सुद्धा नुकसान झालं, असे ते म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पहिल्या टप्प्याची यादी जाहीर केली . विद्यार्थ्यांची फीस लाईटची बिलाचा प्रश्न टँकरची मागणी असेल, याची घोषणा झाली. मात्र प्रत्यक्ष मदतीसाठी थोडासा वेळ लागेल, असे सहकार मंत्र्यांनी जाहीर केले. कर्जमाफी संदर्भात सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळेल सगळे शेतकरी संपल्यानंतर आमचं कामकाज बंद होईल, असं बाबासाहेब पाटील म्हणाले.
