AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! महायुतीत पुन्हा फाटलं? मग युतीचा काय फायदा? शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार

महायुतीत पुन्हा अंतर्गत वाद उफाळला आहे. शिंदे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भाजपवर सरकारी कार्यक्रमांतून शिवसेनेला डावलल्याची तक्रार केली आहे. मनोज जरांगे पाटील ऑडिओ क्लिप प्रकरणानंतर आणि विधानपरिषद पराभवानंतरही युतीतील खदखद कायम आहे. "युतीत राहून फायदा काय?" असा संतप्त सवाल शिंदे सेनेचे नेते विचारत आहेत, ज्यामुळे युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोठी बातमी ! महायुतीत पुन्हा फाटलं? मग युतीचा काय फायदा? शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 07, 2026 | 1:23 PM
Share

गिरीश गायकवाड, टीव्ही९ मराठी प्रतिनिधी : मनोज जरांगे पाटील यांनी एक कथित ऑडिओ क्लिप महाराष्ट्राला ऐकवली होती. त्यात भाजपचे काही लोक मनोज जरांगे पाटील यांना मॅनेज करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 500 कोटी रुपये दिल्याचं बोलताना दिसत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ही क्लिप आल्यानंतर शिंदे सेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. हा वाद संपत नाही तोच विधान परिषद निवडणुकीत भाजपचा सडकून पराभव झाल्याने पुन्हा एकदा शिंदे सेना आणि भाजप आमनेसामने उभी ठाकली होती. हे दोन वाद थांबलेले असतानाच पुन्हा एकदा महायुतीत फाटल्याचं दिसत आहे. महायुतीत गळचेपी सुरू असल्याची तक्रारच शिंदे सेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे. भाजप विरोधात ही तक्रार करण्यात आल्याने महायुतीत अजूनही काहीच अलबेल नसल्याचं चित्र आहे.

महायुतीत शिवसेनेची गळचेपी सुरूच असल्याची तक्रार पक्षातील नेत्यांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. गेल्या वर्षभरापासून शासकीय कार्यक्रमातून शिवसेनेच्या नेत्यांना भाजप डावलत आहे. हे अत्यंत चुकीचं असून त्यावर शिंदे सेनेच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. थेट एकनाथ शिंदे यांच्याकडेच ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आपल्या सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याची या नेत्यांची भावना आहे.

मग युतीत राहून फायदाच काय?

संविधान बचाव पदयात्रा, नवी मुंबई एयरपोर्टवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावर, कुलाब्यात घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम, वर्षावरील दुष्काळ बेठक यातून शिवसेना नेत्यांना डावललं जात असल्याने नेते नाराज आहेत. युतीत असूनही डावललं जात असेल तर मग युतीचा फायदा काय? अशी संतप्त भावनाच शिवसेनेच्या खासदार, आमदार आणि नगरसेवकांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

चिंता करू नका

प्रशासकिय अधिकारी आपलं न ऐकता भाजपच्याच नेत्यांचंच ऐकतात. त्यांना एवढा अधिकार कुणी दिला? असा संतप्त सवालही भाजपच्या नेत्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांनी नेत्यांच्या या तक्रारी ऐकून घेतल्या आहेत. यावर योग्य तो तोडगा काढू. चिंता करू नका, असं आश्वासन शिंदे यांनी या नेत्यांना दिल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या 15 दिवसातच वाद

गेल्या 15 दिवसांपासून शिवसेना आणि भाजप आमनेसामने आला आहे. त्यामुळे महायुतीत खदखद असल्याचं समोर आलं आहे. महायुतीतील ही खदखद मिटवण्यासाठी वरिष्ठ नेते काय पावलं उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला
तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
Sunetra Pawar On Sharad Pawar : तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार...
शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज....
Sharad Pawar Health : शरद पवारांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; आजच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
CM Devendra Fadnavis On Farmers : फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना अभूतपूर्व दिवाळी भेट; महसूल विभागाचं....
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स.....
Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स, 13 वर्षांचा प्रवास संपला