Gold Rate Today : सोन्याचे भाव वाढले, चांदी स्वस्त; जाणून घ्या किमती

| Updated on: Oct 12, 2021 | 5:25 PM

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, कॉमेक्सवर सोन्याच्या स्पॉट किमती मजबूत व्यापार करत आहेत. तो मंगळवारी 0.19 टक्क्यांनी वाढून 1,757 डॉलर प्रति औंस झाला. दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते.

Gold Rate Today : सोन्याचे भाव वाढले, चांदी स्वस्त; जाणून घ्या किमती
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नवी दिल्लीः Silver, Gold Price Today: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मंगळवारी सोन्याचे भाव 129 रुपयांनी वाढून 46,286 रुपये प्रति 10 ग्रॅम झालेत. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूच्या किमती वाढल्याने आणि रुपयाच्या घसरणीमुळे हे घडले. यापूर्वीच्या व्यवहारात सोने प्रति 10 ग्रॅम 46,157 रुपयांवर बंद झाले होते. त्या तुलनेत चांदी 120 रुपयांनी घसरून 60,369 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापारात चांदी 60,489 रुपये प्रति किलो होती. मंगळवारी भारतीय रुपया 6 पैशांनी घसरून 75.42 वर आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने उसळीसह $ 1,757 प्रति औंस आणि चांदी $ 22.56 प्रति औंसवर सपाटपणे व्यवहार करीत होते.

सोन्याचे भाव का वाढले?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, कॉमेक्सवर सोन्याच्या स्पॉट किमती मजबूत व्यापार करत आहेत. तो मंगळवारी 0.19 टक्क्यांनी वाढून 1,757 डॉलर प्रति औंस झाला. दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. चांदीमध्येही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.

भारतात बनणार गोल्ड एक्सचेंज

बाजार नियामक सेबीने बुधवारी गोल्ड एक्सचेंज उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गोल्ड एक्सचेंजमध्ये सोन्याचा व्यापार इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (पावती) म्हणजेच ईजीआर द्वारे केला जाईल. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (EGR) कोणत्याही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा नवीन स्टॉक एक्सचेंजमधून सुरू केली जाईल. सेबीच्या मंजुरीनंतरच हे ठरवले जाईल की ईजीआरची किमान किंमत किती असेल. यानंतर शेअर बाजार EGR चे सोन्यात रूपांतर करू शकतील. सेबीच्या मते, गोल्ड एक्स्चेंजमध्ये EGR च्या ट्रेडिंग आणि फिजिकल सोन्याच्या डिलिव्हरीसाठी संपूर्ण इको-सिस्टम असेल आणि देशातील सोन्याच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता आणि निवड प्रदान करेल. ईजीआरच्या खरेदी आणि विक्रीसाठी गोल्ड एक्सचेंज हे राष्ट्रीय प्लॅटफॉर्म असेल. ईजीआर अंतर्गत मानक सोन्याचा व्यापार केला जाईल आणि देशभरात सोन्याची एकसमान किंमत रचना तयार करण्यात मदत होईल.

दिवाळीपर्यंत सोनं 49 हजारांवर

सध्या सोनं 45 ते 46 हजार रुपये प्रतितोळा या पातळीवर आहे. ही सोने खरेदीसाठी चांगली संधी असल्याचे मानले जात आहे. पुढील तीन महिन्यांत येथून सोन्याच्या किंमतीत 4-5 हजारांपर्यंत वाढ शक्य आहे. स्वस्तिक इन्व्हेस्टमेंटचे अभिषेक चौहान यांच्या अंदाजानुसार दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 49 हजारापर्यंत पोहोचू शकतो. पुढील तीन महिन्यांत चांदीचा भाव सध्याच्या पातळीपासून 10 हजारांपर्यंत वर जाऊ शकतो. गेल्या आठवड्यात, मार्च 2022 च्या डिलिव्हरीसाठी चांदीचा बंद भाव 60,967 रुपये प्रति किलो होता.

दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

आता परदेशात जाताना रोख पैशाची चिंता नाही, SBI ने आणले खास कार्ड, जाणून घ्या

बजाज फिनसर्वकडून गृहकर्जाचे व्याजदर कमी, 645 रुपये किंवा लाखांच्या EMI वर 5 कोटींचे कर्ज