सोनं पुन्हा स्वस्त, आणखी किती दर घसरणार? वाचा लेटेस्ट भाव, सोन्या चांदीच्या दरावर स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Mar 06, 2021 | 9:47 AM

गेल्या वर्षी म्हणजे 7 मे रोजी पहिल्यांदाच सोन्यानं 45 हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर सोन्याचे दर चढेच राहिले. (gold silver price today)

सोनं पुन्हा स्वस्त, आणखी किती दर घसरणार? वाचा लेटेस्ट भाव, सोन्या चांदीच्या दरावर स्पेशल रिपोर्ट
Gold Rate Today
Follow us on

मुंबई : आठवडा संपता संपता सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरात पुन्हा घसरण पहायला मिळत आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस दर आणखी कमी झाले. सोनं बाराशे रुपयांनी कमी होत प्रतितोळा 45 हजार 300 रुपयावर आलेलं आहे. तर चांदी तब्बल तीन हजार रुपयांनी घसरली आहे. सध्या ती प्रतिकिलो 66 हजार 500 रुपये इतकी आहे. सोन्याच्या दरात झालेली घसरण ही गेल्या दहा महिन्यातला सर्वात निच्चांकी मानली जात आहे. (gold silver price today on 06th March 2021 maharashtra mumbai pune latest rate and updates)

7 मे 2020 ते आता

गेल्या वर्षी म्हणजे 7 मे रोजी पहिल्यांदाच सोन्यानं 45 हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर सोन्याचे दर चढेच राहिले. अर्थसंकल्पात इम्पोर्ट ड्युटी कमी करण्याची घोषणा केली गेली आणि त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण सुरु झाली. गेल्या दहा दिवसात दोन दिवसांचा अपवाद वगळता सोन्याचे भाव पडताना दिसत आहेत. मे महिन्यानंतर पहिल्यांदाच दर 46 हजारांच्या खाली आले आहेत.

सोनं आणखी स्वस्त होणार?

आता लग्नाचा सिझन सुरु झालेला आहे आणि त्यामुळे सोन्याला मागणीही बऱ्यापैकी आहे. सोन्यातल्या गुंतवणुकीसाठीही हा काळ चांगला असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. गेल्या ऑगस्टमध्ये सोनं प्रतितोळा 56 हजार 254 वर पोहोचलेलं होतं. तो उच्चांकी भाव होता. त्यानंतर आता तो 45 हजाराकडे आलेला आहे. याचाच अर्थ सोनं जवळपास 12 हजारांनी स्वस्त झालेलं आहे. पुढच्या काही काळात सोनं आणखी स्वस्त होऊन ते 42 हजारापर्यंत येऊ शकतं असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. चांदीही याच सर्व काळात जवळपास 10 हजारानं स्वस्त झाली आहे.

सोन्याचे दर का घसरतायत?

मोदी सरकारने सोन्याची इम्पोर्ट ड्युटी अडीच टक्क्यांनी कमी केली. त्याचा थेट परिणाम दर कमी होण्यात दिसून येतो आहे. डॉलर इंडेक्सही दर कमी होण्यामागचं एक कारण आहे. तो जसाही पडत होता तसे दर चढत होते. पण आता इंडेक्स पुन्हा व्यवस्थित होताना दिसतोय तर भाव कमी होत आहेत. गुंतवणूकदारांचा ओढाही बिटकॉईन आणि इक्विटीकडे आहे. त्यामुळे सोने दर कमी होत असल्याचं जाणकार सांगतात.

संबंधित बातम्या :

सोनं-चांदी झाली स्वस्त; वाचा पुढे सोनं वधारेल की आणखी घसरेल

सोने आणि चांदी 1217 रुपयांनी स्वस्त; झटपट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव

(gold silver price today on 06th March 2021 maharashtra mumbai pune latest rate and updates)