AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची स्वस्ताई, ग्राहकांना या वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमती घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी पण मौल्यवान धातूच्या किंमती उतरल्या. गेल्या सात दिवसांत सोने 1200 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे ग्राहकांनी सराफा बाजाराकडे खरेदीसाठी धाव घेतली आहे.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीची स्वस्ताई, ग्राहकांना या वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा
| Updated on: Jan 10, 2024 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली | 10 जानेवारी 2024 : सोने-चांदीच्या किंमतींनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. तरी यापूर्वी चांदीत मोठी घसरण झाली आहे. या 3 जानेवारीपासून मौल्यवान धातूत घसरणीचे सत्र सुरु आहे. या आठवड्यातही पडझड सुरु होती. पण चांदीने अचानक झेप घेतली. चांदीत किलोमागे 200 रुपयांची वाढ झाली. गेल्या सात दिवसांत सोने 1200 रुपयांनी तर चांदी 2500 रुपयांनी घसरले आहे. किंमती घसरल्याने ग्राहकांचे पाय सराफा बाजाराकडे वळले आहेत. आता सोने-चांदीची अशी आहे किंमत (Gold Silver Price Today 10 January 2024)

सोन्याने दिली आनंदवार्ता

डिसेंबरमध्ये उच्चांकी झेप घेणाऱ्या सोन्याने जानेवारीच्या सुरुवातीला ग्राहकांना दिलासा दिला. 3 जानेवारी सोने इतकेच घसरले. 4 जानेवारी 440 रुपयांची घसरण झाली. 5 जानेवारीला सोने 130 रुपयांनी घसरले. 6 जानेवारी रोजी त्यात 20 रुपयांची वाढ झाली होती. 8 जानेवारीला किंमती 220 रुपयांनी उतरल्या. 9 जानेवारीला शंभर रुपयांनी किंमत कमी झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी चमकली

चांदीत या वर्षाच्या सुरुवातीला घसरण दिसून आली. 3 जानेवारी रोजी 300 रुपयांची घसरण झाली. 4 जानेवारीला चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली. 8 जानेवारी रोजी 200 रुपयांची घसरण झाली. 9 जानेवारी किंमतीत तितकीच वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,600 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्याच्या किंमती वधारल्या. तर चांदी पण महागली आहे. 24 कॅरेट सोने 62,415 रुपये, 23 कॅरेट 62,165 रुपये, 22 कॅरेट सोने 57172 रुपये झाले. 18 कॅरेट 46,811 रुपये, 14 कॅरेट सोने 36,513 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,840 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

हॉलमार्कनुसार कॅरेट

  • भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
  • काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन