AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : नवीन वर्षात सोने-चांदीची दरवाढीला सलामी! असे झरझर वाढले भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने नवीन वर्षाला दरवाढीची सलामी दिली. गेल्या वर्षात डिसेंबर महिन्यात मौल्यवान धातूने जोरदार मुसंडी मारली होती. शेवटच्या आठवड्यात एकदाच भाववाढीला ब्रेक लागला होता. नवीन वर्षांत सोने-चांदीने उसळी घेतली. आता सोने लवकरच 65 हजार रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. नवीन रेकॉर्ड पण या काळात होऊ शकतो.

Gold Silver Rate Today : नवीन वर्षात सोने-चांदीची दरवाढीला सलामी! असे झरझर वाढले भाव
| Updated on: Jan 04, 2024 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली | 3 जानेवारी 2024 : सोने-चांदीने नवीन वर्षात, 2024 मध्ये मुसंडी मारली. मौल्यवान धातूच्या किंमती उसळल्या. चांदीने पण दरवाढीचे सत्र कायम ठेवले. सोने आणि चांदीने डिसेंबर महिन्यात भाववाढीचा उच्चांक गाठला होता. नवीन रेकॉर्डमुळे ग्राहकांचा हिरमोड झाला होता. या आठवड्यातच सोने आणि चांदी त्यांचा यापूर्वीचा उच्चांकी स्तर गाठण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहे. त्यामुळे मौल्यवान धातू (Gold Silver Price Today 3 January 2024) लवकरच दरवाढीचा नवीन विक्रम नावावर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सोने लवकरच 65 हजारांच्या पुढे धाव घेण्याची शक्यता आहे. सध्या काय आहे सोने-चांदीचा भाव?

अशा वधारल्या किंमती

गेल्या वर्षात शेवटच्या आठवड्यात सोने 700 रुपयांनी महागले. तर अखेरच्या दिवशी 400 रुपयांची घसरण दिसली. नवीन वर्षात सोने पुन्हा चमकले. गुडरिटर्न्सनुसार, 2 जानेवारी 2024 रोजी सोने 270 रुपयांनी वधारले. आता 22 कॅरेट सोने 58,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 64,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी पण चमकली

गेल्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात चांदी 1100 रुपयांनी महागली. 29 डिसेंबर रोजी भाव 1200 रुपयांनी घसरले. नवीन वर्षांत चांदी पुन्हा चमकली. 2 जानेवारी 2024 रोजी चांदीचा दर 300 रुपयांनी वधारला. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,900 रुपये आहे. एका वर्षात चांदीने तगडा रिटर्न दिला आहे. चांदीने एका किलोमागे ग्राहकांना 7200 रुपयांची कमाई करुन दिली.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 63,602 रुपये, 23 कॅरेट 63,347 रुपये, 22 कॅरेट सोने 58,259 रुपये झाले. 18 कॅरेट 47,702 रुपये, 14 कॅरेट सोने 37,207 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,133 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?