AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने पुन्हा जमिनीवर, चांदी तर केव्हाच फिरली माघारी, असे आहेत भाव

Gold Silver Rate Today : जागतिक बाजारातील घडामोडींचा फटका सोने-चांदीला बसला. सोने पुन्हा जमिनीवर आले. तर चांदी केव्हाच माघारी फिरली आहे. काय आहे भावातील बदल, जाणून घ्या..

Gold Silver Rate Today : सोने पुन्हा जमिनीवर, चांदी तर केव्हाच फिरली माघारी, असे आहेत भाव
| Updated on: Jul 26, 2023 | 9:19 AM
Share

नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : जुलै महिन्यात सोन्याने आघाडी उघडली होती. चांदीने भरारी घेतली होती. मे आणि जून महिन्यानंतर पहिल्यांदा किंमतींना उभारी मिळाली होती. गेल्या 20 दिवसांत दरवाढीचे सत्र सुरु होते. सोने-चांदी भावात (Gold Silver Price Today) नवीन रेकॉर्ड करण्याची आशा होती. आतापर्यंत सोन्याने 2,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर चांदीने 6500 रुपयांची झेप घेतली आहे. पण 21 जुलैपासून ते आतापर्यंत, एका आठवड्यात सोने-चांदीला चमकदार कामगिरी करता आली नाही. सोन्याने 60 हजारांचा पल्ला गाठला. तर चांदी किलोमागे 74,190 रुपयांवर पोहचली. दोन्ही धातूंच्या घौडदोडीला ब्रेक लागला. अमेरिकेतील घडामोडींचा हा परिपाक आहे. सध्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

किंमती जमिनीवर

  1. सोने आणि चांदीने जुलै महिन्यात मोठी उसळी घेतली होती.
  2. 21 आणि 22 जुलै रोजी सोन्यात 550 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली.
  3. 21 जुलै रोजी सोन्यात 300 रुपये तर 22 जुलै रोजी 250 रुपयांची घसरण झाली.
  4. 23 आणि 24 जुलै रोजी भावात मोठा बदल झाला नाही.
  5. तर 25 जून रोजी भावात 150 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली.
  6. 22 कॅरेट सोने 55,150 रुपये तर 24 कॅरेट सोने 60,150 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले.
  7. 26 जुलै रोजी सकाळच्या सत्रात अद्याप किंमतीत बदल झालेला नाही.
  8. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.

चांदीत पडझड

चांदीमध्ये मोठी पडझड झाली. चांदीच्या किंमतीत 2,000 रुपयांची घसरण झाली. 22 जुलै रोजी सोन्यात 1000 रुपयांची घसरण झाली. तर 24 आणि 25 जुलै रोजी प्रत्येकी 500 रुपयांनी किंमती घसरल्या. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती आहेत.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,143 रुपये, 23 कॅरेट 59,906 रुपये, 22 कॅरेट सोने 54,175 रुपये, 18 कॅरेट 44,357 रुपये, 14 कॅरेट सोने 34,599 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,939 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच