भारतीय स्टार्टअप कंपन्यांना अच्छे दिन; गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 12 अब्ज डॉलर भांडवलाची उभारणी

| Updated on: Apr 02, 2022 | 1:23 PM

स्टार्टअप कंपन्या ही भारताची नवी ओळख बनत आहेत. भारतीय स्टार्टअप कंपन्यांनी गेल्या आर्थिक वर्षाच्या (FY 2021-22) शेवटच्या तिमाहीमध्ये परदेशी बाजारातून तब्बल 12 अब्ज डॉलर म्हणजेच 90,000 कोटी रुपयांची उभारणी केली. त्याच्या मागील आर्थिक वर्षामध्ये शेवटच्या तिमाहीत कंपन्यांनी चार अब्ज डॉलरच्या भांडवलाची उभारली केली होती.

भारतीय स्टार्टअप कंपन्यांना अच्छे दिन; गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत 12 अब्ज डॉलर भांडवलाची उभारणी
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नवी दिल्ली : स्टार्टअप कंपन्या ही भारताची नवी ओळख बनत आहेत. भारतीय स्टार्टअप कंपन्यांनी गेल्या आर्थिक वर्षाच्या (FY 2021-22) शेवटच्या तिमाहीमध्ये परदेशी बाजारातून तब्बल 12 अब्ज डॉलर म्हणजेच 90,000 कोटी रुपयांची उभारणी केली. त्याच्या मागील आर्थिक वर्षामध्ये शेवटच्या तिमाहीत कंपन्यांनी चार अब्ज डॉलरच्या भांडवलाची उभारली केली होती. आर्थिक वर्ष 2020-2021 आणि आर्थिक वर्ष 2021- 2022 यांची तुलना केल्यास हे प्रमाण जवळपास तीप्पट आहे. डेटा ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म (FinTracker) च्या आकेडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये एकूण 528 स्टार्टअप कंपन्यांचा समावेश होता. या स्टार्टअपनी जानेवारी ते मार्च 2022 मध्ये एकूण 12.06 अब्ज रुपयांच्या भांडवलाची उभारणी केली आहे. यातील अनेक स्टार्टअप कंपन्यांचा समावेश हा यूनिकॉर्न कॅटेगिरीमध्ये झाला आहे.

डिसेंबरपर्यंत 82 स्टार्टअप कंपन्याचा युनिकॉर्नमध्ये समावेश

‘FinTracker च्या आकेडेवारीनुसार गेल्या आर्थिक वर्षामध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत 82 कंपन्यांचा समावेश हा युनिकॉर्नमध्ये झाला होता. ज्या कंपन्यांचे मूल्य हे 100 कोटी डॉलरच्या वर जाते त्यांचा समावेश हा युनिकॉर्नमध्ये करण्यात येतो. डिसेंबर 2014 पासून ते डिसेंबर 2021 पर्यंत भारतीय स्टार्टअप कंपन्यांनी एकूण 38.40 अब्ज डॉलर भांडवलाची उभारणी केली असल्याचे देखील आकडेवारीतून समोर आले आहे. अमेरिका आणि चीन नंतर भारताचा जगात स्टार्टअप कंपन्यांमध्ये तिसरा क्रमांक लागतो.

भारतात स्टार्टअप कंपन्यांना अच्छ दिन

स्टार्टअप कंपन्यांच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या पुढे केवळ दोन देश अमेरिका आणि चीन आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये भारतीय स्टार्टअप कंपन्यांनी तब्बल 12.06 अब्ज रुपयांच्या भांडवलाची उभारणी केली आहे. हे प्रमाण आर्थिक वर्ष 2020-2021 च्या तुलनेत तीप्पट आहे. एवढेच नव्हे तर डिसेंबरपर्यंत 82 स्टार्टअप कंपन्याचा समावेश हा युनिकॉर्नमध्ये झाला आहे.

संबंधित बातम्या

राज्याने सीएनजी पीएनजीचे दर कमी केले, कंपन्यांनी दर वाढवले, या महागाईचं करायचं काय?

इंधन दरवाढीचा फटका, आजपासून मुंबईत उबेरचे चार्ज वाढले, भाड्यात 15 टक्क्यांची वाढ

Today’s gold, silver prices: सोन्याच्या दरात तेजी, चांदीही वधारली; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव