
गेल्या अक्षय तृतीयेपासून आतापर्यंत सोन्याने 23 हजारांची मोठी झेप घेतली. तोळ्यामागे सोन्याने घेतलेली ही भरारी ग्राहकांचे डोळे दिपवणारी ठरली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला ग्राहकांना दिलासा मिळाला. सोन्याच्या किंमतीत घसरण दिसली. ही घसरण आजही कायम आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सोने लाखांच्या आता आले आहे.
सोने-चांदीच्या दरात घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सोन्याचा दरात तब्बल 1200 रुपयांची घसरण झाली असून चांदीच्या दर सुद्धा 2 हजारांनी घसरले आहेत. सोन्याचे दर जीएसटीसह 96 हजार 400 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 97 हजार 800 रुपयांवर आले आहेत.
दोन दिवसांत जवळपास 3 हजारांची स्वस्ताई
भूराजकीय तणाव, आक्रमक व्यापारी धोरण आणि केंद्रीय बँकांकडून सुरू असलेली सोने खरेदी यामुळे सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पण अक्षय तृतीयेपासून सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली असून दोन दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 2900 रुपयांची घसरण झाली आहे. तर आठवडाभरात चांदीच्या दरात तब्बल 2500 रूपयांनी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून १ लाखांवर पोहोचलेले सोन्या आणि चांदीचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तर आताच सोने सव्वा लाखाच्या घरात
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून घेतलेली निर्णय, रशिया युक्रेन युद्ध, यूएसए आणि चीन यांच्यातील टेरीफ वॉर यासह इतर कारणांमुळे वर्षभरात सोन्या चांदीचे दर वधारले आहे. भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यास सोने आणि चांदी भाव खाईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. युद्ध झाल्यास नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागू शकतात. सोने आताच सव्वा लाखाच्या घरात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हॉलमार्कनुसार कॅरेट
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.