Gold Rate : सोन्याचा जबरदस्त परतावा, ग्राहक मालामाल, एकाच वर्षात इतका फायदा, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भाव काय?
Jalgaon Gold Rate : आज अक्षय तृतीया, सोन्याने ग्राहकांना पुन्हा एकदा मोठा परतावा दिला. जळगाव सराफा बाजारात सोन्याने मोठी भरारी घेतली. सध्या सोन्याचा दर जीएसटीसह ९९ हजार ४९८ रुपये आहे.

आज अक्षय तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक, ज्यांनी गेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी केले, त्यांना या वर्षी मोठा फायदा झाला. ग्राहक मालामाल झाला. सुवर्णपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफा बाजारात सोन्याने मोठी झेप घेतली. जळगावच्या सराफ बाजारात यंदा सोन्या आणि चांदीचे दर लाखांवर पोहचले आहे सध्या जीएसटीसह सोन्याचे दर ९९ हजार ४९८ रुपये असून चांदीचे दर जीएसटीसह एक लाख ९४० रुपयांवर पोहोचले आहेत..
एका वर्षात सोने २३ हजार रुपयांनी महागले
आज साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला सोने खरेदीचा मुहूर्त साधणाऱ्या ग्राहकांना खिशाला मोठी कात्री बसणार आहे. सोने गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा प्रतितोळा तब्बल २३ हजार रुपयांनी महागले आहे. गेल्या वर्षी सोने जीएसटीसह ७६ हजार ७०० रुपये भाव होता. सध्या सोने ९६ हजार ६०० रुपये प्रति तोळा आहे. जीएसटीसह एक तोळे सोने घेण्यासाठी ९९ हजार ४९८ रुपये मोजावे लागत आहेत, यात घडणावळ खर्च वेगळा असतो. तसेच चांदीचे भाव ९८ हजार रुपयांवर असून एक किलो चांदीसाठी जीएसटीसह एक लाख ९४० रुपये मोजावे लागत आहेत.
लाखांचा उंबरठा ओलांडला
सोने-चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढतच असून आता तर तोळाभर सोने असो की किलोभर चांदी घ्यायची झाल्यास एक लाखांहून अधिक रक्कम मोजावी लागत आहे. त्यात आता सुवर्ण खरेदीचा मोठा मुहूर्त असलेली अक्षय्य तृतीयादेखील असल्याने या दिवशी सोने-चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी होऊ शकते असा सराफ व्यवसायिकांचा अंदाज आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून घेतलेली निर्णय, रशिया युक्रेन युद्ध, यूएसए आणि चीन यांच्यातील टेरीफ वॉर यासह इतर कारणांमुळे वर्षभरात सोन्या चांदीचे दर वधारले आहे. भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाल्यास सोने आणि चांदी भाव खाईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. युद्ध झाल्यास नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
