GK : ना अभ्यासाचं टेन्शन, ना माराची भीती… या देशात एकही ‘शाळा’ नाही ! कारण..
No Schools Country : जगभरात सगळीकडे शिक्षण, शाळा असतातच. पण याच पृथ्वीर एक देश असाही आहे, जिथे एक सुद्धा शाळा नाही, कोणतेही शिक्षक तिथे शिकवत देखील नाहीत. असा कोणता देश आहे तो ? चला जाणून घेऊया..

No Schools Country : जगात असंख्य देश आहेत, त्यांच्या विविधतेमुळे ओळखले जातात. आपण एखाद्या देशाबद्दल विचार करतो तेव्हा शाळा-कॉलेज या मूलभूत सुविधा, गरजा वाटतात. पण जगात एक देश असाहीआहे जिथे एकही शाळा किंवा कॉलेज नाही. वाचून आश्चर्य वाटलं ना… पण हे खरं आहे. तो देश म्हणजे व्हॅटिकन सिटी. पहिल्यांदा याबद्दल ऐकल्यावर अशक्य वाटेल. पण हाँ देश कसा चालतो हे समजल्यावर इथे शाळा-कॉलेज का नाही यामागचं कारणंही स्पष्ट होतं.
व्हॅटिकन सिटीमध्ये शाळांची कमतरता ही त्यांच्या अनोख्या लोकसंख्येमुळे आहे. कारण इथली लोकसंख्या फक्त ते 800 ते 900 इतकीच असून त्यात बहुतेक कॅथोलिक पुजारी, नन्स आणि स्विस गार्डचे सदस्य आहेत. व्हॅटिकन सिटीमध्ये कोणतेही लहान मूल कायमचं राहत नाही. कारण तिथे विद्यार्थी राहत नाहीत, त्यामुळे त्याच्या हद्दीत शाळा किंवा कॉलेजेस अर्थात महाविद्यालयांची आवश्यकता नाही.
जन्मावर आधारित नागरिकत्व नाही
इतर देशांप्रमाणे, व्हॅटिकन सिटी जन्माच्या आधारावर नागरिकत्व देत नाही. जे होली सी साठी काम करतात त्यांनाच इथे नागरिकत्व दिलं जातं. यामध्ये पुजारी, अधिकारी आणि स्विस रक्षकांचा समावेश आहे. मात्र, एकदा त्यांची सेवा पूर्ण झाली की, त्यानंतर त्यांचं नागरिकत्व देखील आपोआप संपतं. इथ कोणतंही कुटुंब कायमचं स्थायिक होत नसल्यामुळे, पिढी दर पिढीच्या शिक्षणाची संकल्पना इथे कधीही विकसित झाली नाही.
व्हॅटिकन सिटीच्या बाहेर शिकतात मुलं
इथे काम करणाऱ्या स्विस गार्ड सदस्यांना मुलं असतील, तर ती मुलं ते व्हॅटिकन सिटीमध्ये शिक्षण घेत नाहीत. त्याऐवजी, ते दररोज जवळच्या रोम, इटलीला प्रवास करतात. व्हॅटिकन सिटी या प्रणालीला पूर्णपणे सपोर्ट करतं. व्हॅटिकन सिटीमध्ये प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा नसल्या तरी, जागतिक उच्च शिक्षणात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्हॅटिकनमध्ये सुमारे 65 पोंटिफिकल युनिव्हर्सिटी आणि संस्था आहेत, ज्या प्रामुख्याने रोममध्ये आहेत.
या युनिव्हर्सिटी धर्मशास्त्र, तत्वज्ञान, कॅनन कायदा आणि धार्मिक अभ्यासात स्पेशलाइज्ड आहेत. व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात छोटा देश असून तो फक्त 0.44 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे. त्याची बरीचशी जमीन चर्च, म्युझियम, बागा आणि प्रशासकीय इमारतींनी व्यापलेली आहे. लहान आकार असूनही, या देशाने अनेक जागतिक विक्रम रचले आहेत. या देशात सर्वात लहान रेल्वे लाइन आहे, लॅटिनमध्ये सूचना देणारे एकमेव एटीएम आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून पूर्णपणे घोषित केलेला हा एकमेव देश आहे.
