गुड न्यूज! पुढील वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 9 टक्के राहण्याचा अंदाज

| Updated on: Dec 10, 2021 | 12:37 PM

पुढील आर्थिक वर्षामध्ये भारताचा आर्थिक वृद्धी दर हा 9 टक्क्यांच्या आसपास राहू शकतो, असा अंदाज क्रेडिट सुइस या स्विस ब्रोकरेज फर्मने वर्तवला आहे. पुढील वर्ष भारतासाठी चांगले राहणार असून, अनेक सकारात्मक बदल पहायला मिळतील असेही कंपनीने म्हटले आहे.

गुड न्यूज! पुढील वर्षात देशाचा आर्थिक वृद्धीदर 9 टक्के राहण्याचा अंदाज
Follow us on

नवी दिल्ली : पुढील आर्थिक वर्षामध्ये भारताचा आर्थिक वृद्धी दर हा 9 टक्क्यांच्या आसपास राहू शकतो, असा अंदाज क्रेडिट सुइस या स्विस ब्रोकरेज फर्मने वर्तवला आहे. पुढील वर्ष भारतासाठी चांगले राहणार असून, अनेक सकारात्मक बदल पहायला मिळतील असेही कंपनीने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी भारताचा जीडीपी 10.5 टक्के राहणार असल्याची शक्याता देखील संस्थेने वर्तवली  आहे. दरम्यान चालू आर्थिक वर्षांच्या शेवटी जीडीपीमध्ये वाढ होऊन, तो 9 टक्क्यापर्यंत राहाण्याचा अंदाज काही दिवसांपूर्वीच भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून वर्तवण्यात आला होता. 

चालू वर्षात देखील होऊ शकते वाढ

याबाबत बोलताना सुइसने सांगितले की, कोणत्याही देशाच्या आर्थिक वृद्धी दराबाबत अंदाज वर्तवणे हे कंपनीच्या धोरणामध्ये येत नाही. मात्र प्राप्त आकडेवारीवर नजर टाकल्यास पुढील वर्षामध्ये भारताचा आर्थिक वृद्धीदर हा नऊ टक्क्यांच्या आसपास राहू शकतो, असा अंदाज आहे. अर्थतज्ज्ञ नीलकंठ मिश्रा यांनी म्हटले आहे की, पुढील काळात आर्थिक वृद्धी दर हा 9  टक्क्यांपर्यंत जाईलच, मात्र या आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत आर्थिक वृद्धीदरात आणखी वाढ होऊ शकते.

अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटातून बाहेर

गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. सर्व उद्योगधंदे ठप्प झाल्याने अनेकांना आपले रोजगार गमावावे लागले. याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला होता. आर्थिक वृद्धी दरात मोठ्याप्रमामात घसरण झाली होती. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असून, उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरू झाले आहेत. त्यामुळे आर्थवव्यस्था देखील रुळावर येत असल्याचे पहायाला मिळत आहे. कोरोनाची तिसरी लाट न आल्यास आणि परिस्थिती सामान्य राहिल्यास चालू आर्थिक वर्षांच्या शेवटी जीडीपीमध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

संबंधित बातम्या 

‘टाटा’ची वाहाने महागणार; एक जानेवारीपासून नवे दर लागू

पाचशे रुपयांच्या बनावट नोटांचा व्हिडीओ होतोय व्हायरल; व्हिडीओमधील दावा खरा आहे का?, आरबीआयने दिले स्पष्टीकरण

‘एससीएसएस’मध्ये गुंतवणूक केल्यास होईल मोठा फायदा; जाणून घ्या काय आहे योजना?