Post Office च्या या योजनेत दर महिन्याला केवळ 1724 रुपये गुंतवा, निवृत्तीच्या वेळी एकरकमी 31 लाख रुपये मिळणार

भारतीय पोस्ट कार्यालयाच्या (Indian Post Office) एका पेक्षा एक सरस अशा अनेक योजना आहेत.

Post Office च्या या योजनेत दर महिन्याला केवळ 1724 रुपये गुंतवा, निवृत्तीच्या वेळी एकरकमी 31 लाख रुपये मिळणार
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 3:57 AM

नवी दिल्ली : भारतीय पोस्ट कार्यालयाच्या (Indian Post Office) एका पेक्षा एक सरस अशा अनेक योजना आहेत. त्यापैकी अशाही काही योजना आहेत ज्या वृद्धावस्थेत निवृत्तीनंतर सामान्यांना आधार देण्याचं काम करतील. त्यापैकीच वृद्धावस्था सुरक्षित करणारी एक योजना म्हणजे ग्राम सुविधा (Convertible Whole Life Assurance (Gram Suvidha) योजना. ही योजना खास नागरिकांचं निवृत्तीनंतरचं आयुष्य लक्षात घेऊन बनवण्यात आलीय. या योजनेची पॉलिसी टर्म 60 वर्षे वयापर्यंत आहे (Good schemes of Indian Post Office to get good returns for retirement).

Grama Suvidha योजनेत गुंतवणुकीसाठी कमीतकमी वयाची अट 19 वर्षे आणि जास्तीत जास्त वयाची अट 45 वर्षे आहे. जर एखाद्याने 19 व्या वर्षीच गुंतवणूक सुरु केली तर त्याच्यासाठी प्रीमिमय टर्म 41 वर्षे आणि एखाद्याने 45 व्या वर्षी गुंतवणूक केली तर त्यांच्यासाठी प्रीमियम पेइंग टर्म 15 वर्षे असेल. या योजनेतील कमीत कमी परतावा होणारी रक्कम (सम अश्योर्ड) 10 हजार रुपये आणि जास्तीत जास्त रक्कम 10 लाख रुपये आहे. या योजनेत गुंतवणूक करणारा दर महिन्याला, तिमाहीला, सहामाईला किंवा वार्षिक पद्धतीने पैसे जमा करु शकतो.

गुंतवणूक करणाऱ्याचा मध्येच मृत्यू झाला तर पैसे वारसदाराला मिळणार

जर या योजनेत गुंतवणूक करणाऱ्याचा मध्येच मृत्यू झाला तर वारसदाराला सम अश्योर्ड रकमेशिवाय त्या वेळेपर्यंत जितका बोनस देय आहे तोही मिळतो. जर गुंतवणुकदार वयाच्या 60 वर्षांपर्यंत जीवंत राहिला तर त्याला सम अश्योर्ड रक्कम आणि बोनस दोन्ही रकमा मिळतील. या योजनेत गुंतवणूक केल्यास 4 वर्षांनंतर कर्जही काढता येतं. 3 वर्षांनंतर ही पॉलिसी सरेंडर देखील करता येते.

31 लाख रुपये कसे मिळणार?

1000 रुपयांच्या गुंतवणुकीवर वर्षाला 60 रुपये बोनस मिळतात. 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर वर्षाला 60 हजार रुपये मिळतात. (60/1000*1000000=60000). 35 वर्षांमध्ये बोनसची एकूण रक्कम (60000*35=2100000) 21 लाख रुपये होते. पॉलिसी मॅच्युर झाल्यावर गुंतवणुकदाराला बोनसच्या रुपात 21 लाख आणि 10 लाख सम अश्योर्ड असे एकूण 31 लाख रुपये मिळतील.

हेही वाचा :

पोस्टात 2850 रुपये जमा करा आणि 20 वर्षांनंतर मिळवा 14 लाख, नेमकी योजना काय?

Post Office सेव्हिंग खात्यासाठीही किमान शिल्लक रक्कम आवश्यक, अन्यथा 100 रुपये दंड

मोठी बातमी! आता Post Office मधून पैसे काढणं महागणार, 1 एप्रिलपासून नवा नियम लागू

व्हिडीओ पाहा :

Good schemes of Indian Post Office to get good returns for retirement

Non Stop LIVE Update
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात.
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ
तुझी लायकी XXX...पवारांच्या कार्यकर्त्याला दादांच्या आमदारांची शिवीगाळ.
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?
मतदानावेळी ताई दादांच्या घरी? दादांच्या बंगल्यावर ताई का आल्या?.
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?
महाराष्ट्रात कुठं किती टक्के मतदान? कुठ झाली कमाल तर कुठं वाढल टेन्शन?.
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.