फक्त 10 टक्के भांडवल उभं करा आणि बक्कळ कमवा, जबरदस्त आहे सरकारी योजना

| Updated on: Feb 17, 2021 | 3:15 PM

सरकारी योजना असल्यामुळे या योजनेत फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. तसेच तुम्ही झटपट पैसा कमावून श्रीमंतही होऊ शकता.

1 / 6
यंदाच्या वर्षात तुम्ही एखादा व्यवसाय किंवा आर्थिक गुंतवणूक करायच्या विचारात असाल तर मोदी सरकारची (Modi government scheme) एक योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सरकारी योजना असल्यामुळे या योजनेत फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. तसेच तुम्ही झटपट पैसा कमावून श्रीमंतही होऊ शकता.

2 / 6
केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान उर्जा आणि उत्थान महाअभियान अर्थात पीएम-कुसुम (PM-KUSUM) योजना चालवली जाते. या योजनेतंर्गत तुम्ही तुमच्या खडकाळ किंवा नापीक जमिनीवर सौर पॅनल (Solar panel) लावून कमाई करु शकता.

3 / 6
नक्की काय आहे योजना? - गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात सौरउर्जेचा वापर वाढवण्यासाठी PM-KUSUM योजनेचा विस्तार केला होता. त्यानुसार नापीक, कुरणाच्या जमिनी आणि दलदलीच्या भागातही सौर पॅनल्स उभारण्यास मंजुरी मिळाली होती.

4 / 6
तुम्हाला केवळ 10 टक्के भांडवलाची व्यवस्था करावी लागते. तर बँकांकडून शेतकऱ्यांना 30 टक्के रक्कम कर्जाच्या स्वरुपात दिली जाते. तर केंद्र सरकार सोलर पंपासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 60 टक्के रक्कम देते.

5 / 6
यामुळे जमिनीच्या मालकाला प्रत्येकवर्षी 60 हजार ते एक लाखांचे उत्पन्न मिळू शकते. मात्र, सोलर पॅनल्स लावण्यासाठी तुमची जमीन विद्युत सब-स्टेशनपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर पाहिजे.

6 / 6
योजनेसाठी अर्ज कसा कराल? - PM-KUSUM योजनेत सहभागी होण्यासाठी https://mnre.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. याठिकाणी तुम्हाला आधार कार्ड, संपत्तीचा तपशील आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.