
HDCF And ICICI FD Saving Rate : देशातील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक असणाऱ्या ICICI आणि HDFC या बँकांनी त्यांच्या ग्राहकांना चांगलाच घटका दिला आहे. या दोन्ही बँकांनी एफडी आणि बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केली आहे. एचडीएफसीने घेतलेला हा निर्णय येत्या 10 जूनपासून लागू होईल.
एचडीएफसीच्या निर्णयाअंतर्गत 3कोटी रुपयांपर्यंत कमी ठेव असलेल्या एफडीवर 25 बेसिस पॉइँट्सने कपात करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतेच रेपो दरात थेट अर्ध्या टक्क्याने कपात केली आहे. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या बँकांनी बचत खाते आणि एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरात कपातक केली आहे.
एचडीएफसीच्या नव्या निर्णयानुसार 3 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी असणाऱ्या रकमेवर 25 बेसिस पॉइंट्सने कपात करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आता सामान्य ठेवीदारांना 2.75 ते 6.60 टक्क्यांपर्यंत तसेच ज्येष्ठ नागरिकांना 3.25 ते 7.10 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. एचडीएफसीने बचत खात्यातील ठेवीवर मिळणाऱ्या व्याजदरातही कपात केली आहे. आता हा नवा दर 2.75 टक्के करण्यात आला आहे. याआधी आयसीआयसीआय बँकेनेही आपल्या एफडी आणि आरडीच्या व्याजदरात कपात केली आहे.
HDFC बँकेने सर्वच एफडीवरील व्याजदरांत 25 बेसिस पॉइंट्सने समान कपात केली आहे. याआधी सामान्य ठेवीदारांना 3 ते 6.85 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.5 ते 7.35 टक्के व्याज दिले जात होते. आता हा व्याजदर क्रमश: 2.75 ते 6.60 टक्के आणि 3.25 ते 7.10 टक्के झाला आहे.
HDFC बँकेने बचत खात्यावरील व्याजदरातही 50 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. या निर्णयामुळे आता 50 लाख रुपयांपेक्षा अधिक जमा रकमेवर 2.75 टक्के व्याज मिळेल. याआधी हे व्याज 3.25 टक्के मिळायचे. 50 लाखांपेक्षा कमी ठेवींवर अगोदर 2.75 टक्क्यांनी व्याज मिळायचे.
HDFC आणि ICICI या बँकांव्यतिरिक्त कॅनरा बँक तसेच कोटक महिंद्रा बँकांमनाही एफडी दरात कपात केली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये केलेल्या कपातीनंतर या बँकांनी हा निर्णय घेतला आहे.