Gold Rates : झटक्यात सोनं होणार स्वस्त… या दिवशी येणार गुड न्यूज; मोठी अपडेट समोर

धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी सोनं खूप स्वस्त होण्याची शक्यता आहे. जागतिक अनिश्चितता आणि अमेरिकन बॉन्ड यील्डमुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. HSBC बँकेच्या अंदाजानुसार, येत्या काही वर्षांत सोन्याची सरासरी किंमत कमी होणार आहे, ज्यामुळे सणासुदीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल आणि सोने खरेदीची उत्तम संधी मिळेल.

Gold Rates : झटक्यात सोनं होणार स्वस्त... या दिवशी येणार गुड न्यूज; मोठी अपडेट समोर
gold jewellery
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 10:41 PM

गेल्या काही महिन्यांपासून सोनं आपल्या विक्रमी उच्चांकापेक्षा खूप खाली आलं असून त्याच आकड्यांच्या आसपास व्यवसाय होताना दिसत आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे सोने चांदीचे दर कमी झाल्याचंही दिसून येत आहे. अमेरिकन बॉन्ड यील्डचे भाव वाढल्याने सोनेचांदीचे दर आणखीनच कमी झाले आहेत. असं असलं तरी आता मात्र सोन्या चांदीच्या दरांबाबतची गुड न्यूज आली आहे.

सोन्या चांदीबाबतचा नवा अंदाज आला आहे. येणाऱ्या काळात सोनं अधिक स्वस्त होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काळात म्हणजे धनत्रयोदशी- दिवाळीच्या आधीच देशात सोनं स्वस्त होणार आहे. एसबीसीने ही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे ग्राहकांची चांदीच होणार आहे.

Loading...

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, एचएसबीसी बँकेने 2026 मध्ये सोन्याची सरासरी किमत कमी करून 4490 डॉलर प्रति औंस केली आहे. म्हणजे भारतात ही किंमत 1 लाख 48 हजार 624 रुपये होईल. तर 2027 मध्ये सरासरी किंमतीचा अंदाज कमी करून 4 हजार 825 डॉलर प्रति औंस केली आहे. म्हणजे भारतात याची किंमत सुमारे 1 लाख 59 हजार 724 रुपये प्रति 10 ग्रॅम होऊ शकते. म्हणजेच सरत्या वर्षात दिवाळीच्या आधीच सोनं स्वस्त होणार आहे. मात्र, पुढच्या वर्षी खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. सध्या वैश्विक बाजारात सोनं 4, 184.45 डॉलर प्रति औंस आहे. या आठवड्यात सोनं दोन टक्क्यांनी कमी झालं आहे.

केंद्रीय बँका सोनं कधी खरेदी करणार?

जर सोनं 4 हजार डॉल प्रति औंसच्या आसपास झालं तर केंद्रीय बँका सोने खरेदी सुरू करेल. त्यासोबतच इतर गुंतवणुकीतही सोने खरेदीदारी वाढू शकते. इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक दिवस आधी स्पॉट गोल्ड 4,165.29 डॉलर प्रति औंस होतं.

सोन्याच्या भावात तेजी का?

अमेरिकेत महागाईचे आकडे कमकुवत होत आहेत. त्यामुळे फेड रेट हाइकची आशा कमी झाली आहे. त्यामुळेच गेल्या दोन सत्रात सोन्याची किंमत वाढली आहे. आता गुंतवणूकदारांची नजर अमेरिकेच्या पॅरोल डेटावर आहे. चांदीची वैश्विक बाजारातील सध्याची किंमत 61.18 डॉलर प्रति औंस आहे.

देशात सोन्या चांदीचे भाव

सध्या देशात उत्सवांचा सीजन सुरू असतानाच सोन्याबाबतची माहिती समोर आली आहे. सणासुदीच्या काळात सोने चांदी खरेदी करण्याची भारतात परंपरा आहे. आता दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेटच्या सोन्याचा भाव 1,53,314 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,41,141 रुपये आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,15,563 रुपये आहे. तर चांदीची किंमत 2,35,000 ते 2,51,900 रुपयांपर्यंत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us