… तर माजी गव्हर्नर रघुराम राजन देशाचे अर्थमंत्री होतील?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

नवी दिल्ली : भारतात एखादी योग्य संधी आल्यास परत येण्यासाठी तयार असल्याचं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीनंतर देशात विरोधकांच्या आघाडीची सत्ता आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री केलं जाईल, अशी चर्चा असतानाच त्यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलंय. गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर रघुराम राजन शिकागो विद्यापीठात बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत […]

... तर माजी गव्हर्नर रघुराम राजन देशाचे अर्थमंत्री होतील?
Follow us on

नवी दिल्ली : भारतात एखादी योग्य संधी आल्यास परत येण्यासाठी तयार असल्याचं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीनंतर देशात विरोधकांच्या आघाडीची सत्ता आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्री केलं जाईल, अशी चर्चा असतानाच त्यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलंय. गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर रघुराम राजन शिकागो विद्यापीठात बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

आरबीआय गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना एनडीए सरकारने दुसरी टर्म दिली नव्हती. मंगळवारी द थर्ड पिलर या त्यांच्या नव्या पुस्तकाच्या विमोचनावेळी रघुराम राजन यांना काही प्रश्न विचारण्यात आले. सार्वजनिक सेवा किंवा राजकीय भूमिकेत भारतात परतायला आवडेल का असाही प्रश्न राजन यांना विचारण्यात आला होता.

लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसपा, टीडीपी यांसारख्या विरोधी पक्षांच्या आघाडीचं सरकार आल्यास रघुराम राजन यांना अर्थमंत्रीपदाच्या जबाबदारीसाठी विचारणा केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी नुकतंच एका योजनेचं आश्वासन दिलंय. ही योजना आखताना ज्या अर्थशास्त्रज्ञांशी बातचीत केली, त्यात राजन यांचाही समावेश आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते.