AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीला सोडलं, Bfसोबत पळाली, धोका मिळताच परत आली, नंतर जे घडलं…गजब कहाणीने थक्क व्हाल!

एक धक्कादायक प्रेम प्रकरण समोर आले आहे. एक महिला प्रियकरासोबत घरातील पैसे आणि दागिने घेऊन पळून गेली होती. त्यानंतर दोन वर्षांनंतर तिच्याकडचे पैसे संपल्यानंतर बॉयफ्रेंडने तिला सोडून दिले. ती महिला नवऱ्याकडे परत आली. आता नेमकं काय घडलं होतं चला जाणून घेऊया...

पतीला सोडलं, Bfसोबत पळाली, धोका मिळताच परत आली, नंतर जे घडलं...गजब कहाणीने थक्क व्हाल!
प्रतिकात्मक फोटोImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 16, 2025 | 5:43 PM
Share

एका महिलेने आधी पतीला धोका दिला, नंतर स्वतःच धोक्याची शिकार झाली. तिने प्रेमीसाठी पतीला सोडले. घरातून २ लाख रुपये रोख आणि सर्व दागिने घेऊन ती पळून गेली. प्रेमीने तिला तीन वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या घरात ठेवले. नंतर जेव्हा सर्व पैसे संपले, तेव्हा तो म्हणू लागला की आणखी पैसे आण. महिलेने सांगितले की मी पैसे कुठून आणू, तेव्हा तो तिला मारहाण करू लागला. शेवटी प्रेमीने तिला एका ट्रेनमध्ये बसवले आणि स्वतः कुठेतरी पळून गेला. त्यानंतर जे घडलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

नेमकं काय घडलं?

ही घटना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडली आहे. बॉयफ्रेंडने फसवल्यानंतर महिला हतबल झाली होती. तिला काय करावे सुचत नव्हते. शेवटी ती महिला पुन्हा पतीकडे परत आली. रडत-रडत महिलेने पतीला संपूर्ण कहाणी सांगितली. त्यानंतर पतीने जे काही केले ते ऐकून सर्वजण चकीत झाले. पत्नीची परिस्थिती पाहता पतीने तिची साथ दिला. नंतर दोघे पोलीस ठाण्यात गेले आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. सध्या, महिलेने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पैसे आणि दागिने घेऊन गेली होती महिला

महिलेने पोलिसांना सांगितले की, एका तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जेव्हा जेव्हा तिचा पती घराबाहेर असायचा, तेव्हा तो भेटायला घरी यायचा. दोघांमध्ये संबंध निर्माण झाले. नंतर तरुणाने सांगितले की तो तिच्याशी लग्न करू इच्छितो. महिला म्हणाली, मी त्याच्या बोलण्यात आले होते. मी पतीचा विचार केला नाही. घरातून २ लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने घेऊन मी प्रेमीसोबत पळून गेले. पण काही दिवसांत प्रेमीने सर्व पैसे खर्च करून टाकले आणि नंतर मारहाण करू लागला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी तिला जळत्या सिगारेटने शरीरावर चटके द्यायचा.

लग्नाचा बहाणा करून घरात बलात्कार केला

महिलेने सांगितले की, आरोपीने तिला पीथमपूर, इंदूर आणि सीहोरमध्ये वेगवेगळ्या भाड्याच्या खोल्यांमध्ये ठेवले. या काळात त्याने अनेक वेळा तिचे शारीरिक शोषण केले आणि तिचे पैसे व दागिने खाणे-पिणे आणि खोल्यांचे भाडे देण्यात उडवले. पीडितेने सांगितले की, जेव्हा सर्व पैसे संपले आणि दागिने विकले गेले, तेव्हा तो आणखी पैशांची मागणी करू लागला. जेव्हा तिने सांगितले की आता पैसे कुठून आणणार, तेव्हा तिला मारहाण करू लागला.

आरोपीने तिला केवळ निर्दयी मारहाणच केली नाही, तर शरीरावर जळत्या सिगारेटने अनेक चटकेही दिले. मग एक दिवशी इंदूरवरुन येणाऱ्या ट्रेनमध्ये बसवून तो निघून गेला. महिलेने सांगितले की, पतीकडे परत येऊन तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि नंतर पोलिसांची मदत घेतली. सध्या, पोलिस आरोपीच्या शोधात आहेत.

Follow Us
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!
गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; पवारांबाबत केलं मोठं....
Shashikant Shinde | गुंगी गुडिया वादावर शशिकांत शिंदे थेट बोलले; सुनेत्रा पवारांबाबत केलं मोठं विधान, म्हणाले...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बल...
शिवसेना चिन्हाचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? कोर्टात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; मात्र...
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार
LIVE अपडेट्स! शिवसेना पक्ष, चिन्हाप्रकरणी सुनावणी सुरू; सुरतहून आमदार गुवाहटीला गेले हा योगायोग...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष...
केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? यंदा 3 दिवसांचं विशेष अधिवेशन, नेमकी कसली चर्चा?
कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?
मोठी बातमी! कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पहाच
अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा
Rahul Gandhi on Amit Shah | अमित शाह तोंड लपवत आहेत; ते विद्यार्थ्यांचे गुन्हेगार - राहुल गांधींचा थेट हल्ला!
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू थेट
दिल्लीत भेटीगाठी सुरू! राहुल गांधींसोबतच्या भेटीनंतर किरण रिजीजू यांची थेट अमित शाह यांच्यासोबत बैठक, पडद्याआड मोठ्या अडामोडी
इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला प्रस्ताव
मोठी बातमी! इन्शुरन्स नाही? मग पेट्रोलही नाही; सुप्रीम कोर्टाचा केंद्राला मोठा प्रस्ताव!
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन
मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाकडून तातडीचे निर्देश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधित...