India GDP: भारतीय अर्थव्यवस्था सुसाट, विकासदर 7 टक्के राहण्याचा अंदाज, IMF च्या जागतिक अहवालात काय?
IMF India GDP Report: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने भारताचा विकास दराचा अंदाज वाढवून 7 टक्के इतका जाहीर केला. जगावर मंदीचे आणि युद्धाचे सावट असताना भारतीय अर्थव्यवस्था सुसाट निघाली आहे. चीनलाही भारताने मागे टाकले आहे. या यादीत भारतानंतर कोणती अर्थव्यवस्था आहे वेगवान?

IMF India GDP Report: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने (IMF) भारतीय अर्थव्यवस्थेविषयी मोठा दावा केला आहे. संपूर्ण जगात मंदीबाई वस्तीला आलेली असताना आणि युद्धाचे संकट घोंगावत असताना भारतीय अर्थव्यवस्थेची चमक डोळे दिपवणारी ठरली आहे. IMF च्या ताज्या अहवाल 2026 साठी भारताचा विकास अंदाज 6.4 टक्क्यांहून थेट वाढून 7 टक्के करण्यात आली आहे. जागितक बँकेपासून ते ओईसीडी (OECD) सारख्या मोठ्या संस्थांनी सुद्धा भारताच्या विकासदरावर शिक्कामोर्तब केले आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती वधारल्या आहेत. तरीही भारतीय बाजारात मजबुती आहे. जागतिक अर्थतज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. या दमदार कामगिरीमुळे जागतिक पटलावर भारताची आर्थिक ताकद दिसून आली आहे.
चीनसह इतर देशांच्या तुलनेत जबरदस्त कामगिरी
IMF च्या अहवालानुसार, जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचे आर्थिक वर्चस्व दिसून आले. प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा विकास दर सर्वात वेगवान आहे. चीनचा अंदाजित विकास दर 4.5 टक्के असेल. म्हणजे आर्थिक वाढीबाबत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. तर दूर दूरपर्यंत युरोपातील देश नाहीत. विकसीत देशांनाही हा विकासदर गाठता आलेला नाही.
जागतिक बँकेचा विश्वास
केवळ आयएमएफच नाहीतर जगातील अनेक मोठ्या संस्थांनी भारताच्या विकासदराबाबत विश्वास दाखवला आहे. जागतिक बँकेने एक अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार घरगुती विक्रीत भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ ठरली आहे. 2028 ते 2031 यादरम्यान जागतिक अर्थव्यवस्थेची धाव सरासरी 3.2 टक्के इतकी असेल. कोरोनापूर्वी हा आकडा 3.7 टक्के इतका होता. सध्या अनेक देशांसमोर ऊर्जा संकट आहे. तर भारतीय अर्थव्यवस्था पुढील काही वर्षे मजबुतीने त्याचा सामना करणार असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.
IMF Growth Forecast 2026:
🇺🇸 US: 2.3%
🇩🇪 Germany: 1.3%
🇫🇷 France: 0.4%
🇮🇹 Italy: 0.8%
🇪🇸 Spain: 2.5%
🇬🇧 UK: 1.3%
🇯🇵 Japan:0.7%
🇨🇦 Canada: 1.1%
🇨🇳 China:4.5%
🇮🇳 India: 7.0%
🇷🇺 Russia:0.9%
🇧🇷 Brazil: 2.2%
🇲🇽 Mexico: 1.5%
🇸🇦 Saudi Arabia: -3.3%
🇳🇬 Nigeria: 4.2%
🇿🇦 South Africa: 1.0%
https://t.co/yoil3EB47M— IMF (@IMFNews) October 13, 2026
प्रमुख देशांचे 2026 मधील अंदाजित विकासदर
जगातील इतर विकसीत देश महागाई, युद्ध आणि भू-राजकीय तणावाचा सामना करत आहेत. या अर्थव्यवस्थांसमोर मंदीचे आव्हान आहे. अशावेळी भारतीय मजबूत अर्थव्यवस्था आणि विकासदरामुळे जगात भारताची आर्थिक ताकद वाढल्याचा दावा करण्यात येत आहे.
अमेरिका: 2.3%
चीन : 4.5%
भारत: 7.0%
जपान: 0.7%
ब्रिटन: 1.3%
जर्मनी: 1.3%
फ्रान्स: 0.4%
इटली: 0.8%
रशिया: 0.9%