AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold And Silver Price Today: सणासुदीच्या तोंडावर सोन्याची स्वस्ताई, आज पुन्हा घसरल्या किंमती, 10 ग्रॅमचा भाव काय?

Gold And Silver Price Today: ऐन सणासुदीच्या तोंडावर सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. विविध कॅरेटमधील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. काल दिल्लीत सोने 1400 रुपयांनी उतरले होते. आज सकाळच्या ताज्या अपडेटनुसार, त्यात पुन्हा मोठी घसरण झाली. काय आहेत आता किंमती?

Gold And Silver Price Today: सणासुदीच्या तोंडावर सोन्याची स्वस्ताई, आज पुन्हा घसरल्या किंमती, 10 ग्रॅमचा भाव काय?
आज सोने आणि चांदीचा भाव काय
| Updated on: Oct 13, 2026 | 7:59 AM
Share

Gold And Silver Price Today: रुपयाचे कमबॅक आणि जागतिक बाजारात मंदीच्या संकेतामुळे सलग दुसऱ्या दिवशी सोने घसरले. अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार, दिल्ली बाजारात काल सोने 1400 रुपयांनी स्वस्त झाले होते. तर आज त्यात पुन्हा 1300 रुपयांची घसरण झाली. 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव आता 1 लाख 53 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरला आहे. शुक्रवारी हा दर 1,54,400 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.चांदीत दोन हजारांची घसरण होऊन किंमत 2 लाख 26 हजार 500 रुपये प्रति किलो इतकी झाली आहे. goodreturns या संकेतस्थळानुसार, मुंबईसह पुण्यात एक ग्रॅम सोन्याचा भाव आज 14,967 रुपये इतका आहे. तर चांदीतही मोठी घसरण झाली आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून (IBJA) सोने आणि चांदीचा भाव जाहीर झाला आहे. त्यानुसार, 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव 14,806 रुपये, 23 कॅरेट एक ग्रॅम सोने 14,747, 22 कॅरेट सोने 1 ग्रॅम सोने 13,562 रुपयांवर आहे. 18 कॅरेट एक ग्रॅम सोने आता 11,105 रुपये, 14 कॅरेट एक ग्रॅम सोने 8,662 रुपये असा भाव आहे. एक किलो चांदीचा भाव काल 2,20,874 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

रुपयाच्या मजबुतीमुळे सोने-चांदीत घसरण

PTI च्या वृत्तानुसार, HDFC सिक्योरिटीजचे विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले की, जागतिक बाजारात मंदीचे संकेत दिसत आहेत. सोमवारी स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण दिसली. जागतिक बाजारात रुपया मजबूत स्थितीत आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतीवर दिसत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपया वधारण्यासाठी उपाय योजना केली होती. सोमवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 96 पैशांनी वधारला. तो 95.75 प्रति डॉलरवर बंद झाला.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान