
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात सतत नवीनवीन माहिती येत आहे. आठव्या वेतन आयोगात किती लाभ होणार आणि कसा लाभ होणार या संदर्भात कर्मचाऱ्यांच्या मनात उत्सुकता आहे. आता नव्या माहिती नुसार आठव्या वेतन आयोगातील काही भत्त्यांना संपवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. सातव्या आयोगात ज्याप्रमाणे केले होते तसेच काहीसे केले जाणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आणि सुविधांवर परिणाम होणार आहे.
७ व्या वेतन आयोगात सरकारने अनेक छोटे – मोठे भत्ते हटवले होते. आणि त्यांच्या जागी मोठ्या वर्गवारीतील भत्त्यांचा समावेश केला होता. यामुळे भत्त्यांची संख्या कमी झाली असली तर पे सिस्टीमला सोपे आणि पारदर्शक बनवले जाऊ शकेल. आता बहुप्रतिक्षित आठव्या वेतन आयोगाबाबत देखील अशाच प्रकारची पावले सरकारकडून उचलली जाऊ शकतात. आता आठव्या वेतन आयोगात अशाच प्रकारची पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तज्ज्ञांच्या म्हणणे आहे की जर काही भत्ते हटवले जात असले तरी कर्मचाऱ्यांचे थेट नुकसान होऊ नये यासाठी बेसिक वेतन वा अन्य सुविधेत वाढ होऊ शकते असे म्हटले जाते. सरकारने सध्या अधिकृतपणे कोणतीही घोषणा केलेली नाही. परंतू कर्मचाऱ्यांच्या आणि पेशनर्सना या संदर्भात मोठी उत्सुकता आहे.
मीडिया रिपोर्टच्या मते, अंदाज असा लावला जात आहे की ट्रॅव्हल अलाऊन्स ,स्पेशल ड्यूटी अलाऊन्स, छोट्या स्तरावरील रिजनल भत्ते आणि काही विभागीय अलाऊन्सना संपवले जाऊ शकते. वास्तविक, असा अंदाज लावला जात आहे की शेवटच्या काही विभागीय अलाऊन्सला समाप्त केले जाऊ शकतो. असे असले तरी या संदर्भात सरकारकडून काही अधिकृतपणे माहिती पुढे आलेली नाही.
कर्मचारी संघटनाचे म्हणणे आहे की 8 व्या वेतन आयोगाने केवळ भत्त्यांमध्ये बदल केलेला नाही , तर महागाई भत्ता ( DA),पेन्शन आणि अन्य लाभांमध्येही सुधारणा होऊ शकते. येत्या काही महिन्यात सरकारच्या वतीने टर्म्स आणि रेफरन्स (ToR) निश्चित होईपर्यंत चित्र आणखी स्पष्ट होऊ शकते.