“कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहा:कार, तरीही देशात आर्थिक स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली”

| Updated on: May 29, 2021 | 9:37 AM

राज्यांचा जीएसटी महसूल तोटा सुमारे 1.50 लाख कोटी रुपयांच्या आसपास होईल, असेही तरुण बजाज म्हणाले (Revenue secretary Tarun Bajaj in GST Council Meeting)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहा:कार, तरीही देशात आर्थिक स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली
Ecommerce
Follow us on

नवी दिल्ली : “देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. गेल्यावर्षी देशात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पण त्या तुलनेत यंदा देशाच्या अर्थव्यवस्थेला फारसा फटका बसलेला नाही,” अशी माहिती महसूल सचिव तरुण बजाज यांनी दिली. देशाला जर दरमहा सरासरी 1.10 लाख कोटी रुपयांचा जीएसटी महसूल मिळाला असेल तर राज्यांचा जीएसटी महसूल तोटा सुमारे 1.50 लाख कोटी रुपयांच्या आसपास होईल, असेही तरुण बजाज म्हणाले. (India Economy in better shape this year as compared to 2020 said Revenue secretary Tarun Bajaj)

जीएसटी परिषदेची महत्त्वाची बैठक

केंद्रीय अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली काल जीएसटी परिषदेची (GST Council Meeting) 43 वी बैठक पार पडली. जवळपास आठ महिन्यानंतर ही जीएसटी परिषदेच्या बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

जीएसटी परिषदेच्या 43 व्या बैठकीदरम्यान तरुण बजाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर आपण गेल्यावर्षीप्रमाणे हेच सूत्र अवलंबले तर जीएसटीमधील फरक 1.58 लाख कोटी रुपये इतका होतो. पण गेल्यावर्षी जेव्हा संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला होता. तेव्हा अर्थव्यवस्था कोलमडली होती. पण यंदा असे झाले नाही.

अर्थव्यवस्थेत 8 टक्के घसरण्याची शक्यता

भारतीय अर्थव्यवस्था गेल्या आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये 8 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गेल्या महिन्यात चालू आर्थिक वर्षात 10.5 टक्के जीडीपी वाढीचा अंदाज वर्तवला होता. त्यासोबतच एडीबीने वर्षामध्ये 11 टक्के वाढीचा अंदाज वर्तविला होता.

पण, केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात राज्यांना 2.69 लाख कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यापैकी 1.58 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेतले जाईल.

लहान करदात्यास खूप मोठा दिलासा

छोटे व्यापारी आणि करदात्यांचे हित लक्षात घेता सरकारने कर्जमाफी योजनेत सवलत देऊन लेट फी कमी केलीय. कोरोना लसीकरणाबाबत निर्मला सीतारमण म्हणाल्या की, दोन लस उत्पादक (सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक) यांना 4500 कोटी रुपये देण्यात आलेत. लस उपलब्ध होण्याबाबत जपान आणि युरोपियन संघाच्या लस उत्पादकांशीही सरकार संपर्कात आहे. येत्या काही महिन्यांत लसची पुरेशी उपलब्धता होईल.

जीएसटीमध्ये कोविड उपकरणांवर त्वरित सवलत

कोरोना मेडिसिन आणि उपकरणांवरील जीएसटीमधील कपात करण्याबाबत निर्मला सीतारमण म्हणाल्या की, या विषयांवर गंभीर चर्चा झालीय. बर्‍याच बाबींवर चर्चा झालीय. जीएसटी कौन्सिलने 31 ऑगस्ट 2021 पर्यंत कोरोना उपकरणांच्या आयातीवरील जीएसटीला सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. जीएसटीमध्ये त्वरित सवलत कोविड उपकरणावर देण्यात आलीय. करात सूट देण्यासाठी मंत्रालयांचा एक गट तयार करण्यात आलाय. इतर कोणत्याही उपकरणांवर कर कमी करायचा की नाही, याबाबत 8 जूनपूर्वी अंतिम निर्णय घेण्यात येईल. काळ्या बुरशीची वाढती प्रकरणं लक्षात घेऊन सरकारने अ‍ॅम्फोटेरिसिन बीला (Amphotericin B) जीएसटीमधून सूट देण्याच्या प्रकारात समाविष्ट केलेय. (India Economy in better shape this year as compared to 2020 said Revenue secretary Tarun Bajaj)

संबंधित बातम्या : 

GST Council Meeting : जीएसटी परिषदेची आज 43 वी बैठक, ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

GST परिषदेच्या बैठकीत मोठी घोषणा, कोविडशी संबंधित वस्तूंवर 31 ऑगस्टपर्यंत आयात शुल्क माफ