Big Warning For India : फक्त 10 दिवस… मोठं काही घडणार; भारतासमोर हे नवं संकट

एसबीआय रिसर्चने भारतासाठी कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींबद्दल गंभीर इशारा दिला आहे. येत्या 10 दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल $110 प्रति बॅरलपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भारतीय बास्केट $130 पर्यंत जाऊ शकते. या वाढीमुळे आयात खर्च वाढेल आणि रुपयाच्या स्थिरीकरणात अडथळे निर्माण होतील, असा अहवाल आहे.

Big Warning For India : फक्त 10 दिवस... मोठं काही घडणार; भारतासमोर हे नवं संकट
India Crude Oil Price Hike
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2026 | 12:55 PM

भारतासाठी मोठा इशारा आला आहे आणि तो पश्चिम आशियाशी संबंधित आहे. एसबीआय रिसर्चने या मोठ्या संकटावर अलर्ट दिला आहे. एसबीआयच्या नव्या रिपोर्टमध्ये या संकटावर थेट भाष्य करण्यात आलं आहे. कच्चे तेल पुन्हा एकदा भारताचा खेळ बिघडवू शकते. केवळ येत्या 10 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 110 डॉलर प्रति बॅरल जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढणार आहे. कच्चे तेल महागले तर भारतात आयात होणाऱ्या वस्तूंची किमत 130 डॉलरवर जाण्याची शक्यता आहे, असा इशारा या रिपोर्टमध्ये देण्यात आला आहे. त्यामुळे भारतावर संकटाचे ढग घोंघावत असल्याचं सांगितलं जात आहे.

जिओ पॉलिटिकल घटनाक्रम आणि ग्लोबल सप्लायचा पुरवठा सुरळीत झाल्याच्या आधारावर कच्च्या तेलाच्या किंमतींना तीन संभाव्य टप्प्यांचं फ्रेमवर्क एसबीआय रिसर्च रिपोर्टमध्ये दाखवण्यात आलं आहे. या रिपोर्टनुसार, वैश्विक कच्च्या तेलाच्या किंमतीत नजीकच्या काळात वेगाने घसरण होण्याची शक्यता सुतराम दिसत नाहीये. तर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचे भाव येत्या 10 दिवसात संभाव्यपणे 110 डॉलर प्रति बॅरल वाढण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर भारतात कच्च्या तेलाची बास्केट 130 डॉलरपर्यंत जाऊ शकते.

Loading...

रुपया स्थिर होण्यास अडचण

सोमवारी एसबीआय रिसर्चचा इकोरॅप रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. त्यात हा इशारा देण्यात आला आहे. भू-राजकिय तणाव आणि पूरवठ्याची वाढती जोखिम यामुळे ब्रेंट पूर्व अंदाजापेक्षा 110 डॉलर प्रति बॅरल झाली तर, भारतीय बास्केटची किमत 10 व्यावसायिक दिवसात पूर्व अंदाज अवधीत सुमारे 127 डॉलर प्रति बॅरलने वाढून 130 डॉलर प्रति बॅरल होईल, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

हा मोठा धोका सातत्याने वाढत्या तेलाच्या किमतीवर सातत्याने दबाव टाकण्याचं काम करत आहे. त्यामुळे भारतीय रुपया स्थिर होण्यास अनंत अडचणी येत आहेत. डेटेड ब्रेंट आणि इंडियन बास्केट दोन्हींसाठी रिकरेंट न्यूरल नेटवर्कचा पूर्व अंदाज वाढती प्रवृत्ती दाखवतो. त्यामुळे तेलाच्या किंमतीत वेगाने घसरण होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे यातून संकेत मिळत आहेत, असं निरीक्षणही या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

तेलाच्या किमंतींचं रुपयाशी कनेक्शन

भारतीय रिझर्व्ह बँकेने रुपया सावरण्यासाठी विविध उपाय योजना लागू केल्या आहेत. त्याचा परिणामही दिसत आहे. भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 1% टक्याने वाढलेला दिसला. या उपायांमध्ये इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOCL), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) साठी एक विशेष डॉलर-पूरवठा विंडो सामील आहेत. ज्यामुळे खुल्या विदेशी मुद्रा बाजारात सुमारे 10-12 अब्ज डॉलर मंथली डॉलरच्या मागणीला स्थानांतरित करण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे. करेन्सी चेंजशी संबंधित गेल्या हस्तक्षेपांच्या विपरित, नवीन अर्थव्यवस्थेत भारतात फॉरेक्श रिझर्व्हमधून डॉलरच्या विक्रीचा समावेश आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us