
राजधानी दिल्ली हे वेगवान शहर आहेच, पण कधीही न थकता, न थांबणारही शहर बनलं आहे, आता स्मार्ट शहरही झालंय. ज्या शहरात कधीकाळी ऑनलाइन ऑर्डर ही फक्त रोजच्या काही वस्तूसांठी दिली जायची, त्याच शहरातले लोक आता सोनं, महागडे मोबाईल आणि प्रीमिअम फूड हे घरबसल्या मागवत आहेत. दिल्ली-एनसीआर आता जलद व्यापाराचे इतके केंद्र बनले आहे, तिथे अवघ्या काही मिनिटांत मोठ्या आणि महागड्या खरेदी देखील केल्या जात आहेत असं इन्स्टामार्टच्या वार्षिक अहवालातून असं दिसून आलं आहे.
अहवालानुसार, दिल्लीकरांनी या वर्षी 24 कॅरेटच्या सोन्याच्या नाण्यांची लक्षणीय खरेदी केली. प्रत्येक चार ऑर्डरपैकी सोन्याच्या नाण्यांची 1 ऑर्डर दिल्ली-एनसीआरमधून आली. याचा स्पष्ट अर्थ असा की लोक आता दागिन्यांच्या शोरूमला भेट देण्याऐवजी सोने खरेदी करण्यासाठी मोबाईल ॲप्सवर अवलंबून आहेत. सण असोत किंवा गुंतवणूक, सोन्यासाठी आता इंस्टंट डिलीव्हरीचा ऑप्शन उपलब्ध आहे.
कंडोम आणि हेल्थ प्रॉडक्टसचीही वाढती मागणी
दिल्लीतील लोक त्यांच्या वैयक्तिक गरजांबद्दल अधिक मोकळे आणि समजूतदार होताना दिसत आहेत. सेक्शुअल वेनेस, हेल्थ केअर आणि पर्सनल टेक ॲक्सेसरीजची मागणी सतत वाढत आहे. त्याच वेळी, चेन्नईशी संबंधित एक आकडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, जिथे एका युजने संपूर्ण वर्षात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे कंडोम ऑर्डर केले.
ऑनलाइन मागवले आयफोन
दिल्लीमध्ये महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदीही झपाट्याने वाढली आहे. या अहवालात असंही उघडकीस आलं की, एका ग्राहकाने एकाच ऑर्डरमध्ये 28 आयफोन ऑर्डर केले होते, त्याची किंमत 20 लाखांपेक्षा जास्त होती. घरी सुविधा उपलब्ध असल्यास दिल्लीतील लोक मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत हे यावरून दिसून आलं.
खाण्या-पिण्याचेही शौकीन दिल्लीकर
खाण्या-पिण्यासाठी दिल्लीकर फेमल असून ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही ही सवय दिसून आली. प्रीमियम चॉकलेट, बेकरी आयटम, फ्रोझन स्नॅक्स आणि इन्स्टंट नूडल्सची मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे, दिल्लीकरांमध्ये कोरियन पदार्थांची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. हॉट चिकन रॅमेन सारख्या पदार्थांना तरुणांची विशेष पसंती मिळाल्याचंही दिसून आलं. दिल्लीमध्ये रात्री 10 ते 11 या वेळेत सर्वाधिक ऑर्डर मिळतात. लोक या काळात चिप्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेज्ड वॉटर सारख्या वस्तू ऑर्डर करणे पसंत करतात. कामाच्या वेळी, अभ्यासाच्या वेळी किंवा मनोरंजनाच्या वेळी रात्री उशिरापर्यंत मंचिंग करणं (खात राहणं) करणे ही दिल्लीकरांची सवय झाली आहेहे यातून स्पष्ट होतं.