भारताचे नवे रिअल इस्टेट हब बनतेय बंगळुरु ? मुंबई आणि पुणे का मागे पडले…

मुंबई आणि पुण्यातील घरांची विक्री थंडावली आहे. आणि बंगळुरु या भारताच्या सिलीकॉन व्हॅलीतील घरांची विक्री वाढत आहे. त्यामुळे बंगळुरु भारताचे नवे रिअल इस्टेट हब बनण्याच्या मार्गावर चालले आहे.

भारताचे नवे रिअल इस्टेट हब बनतेय बंगळुरु ? मुंबई आणि पुणे का मागे पडले...
Bengaluru
| Updated on: Sep 30, 2025 | 6:01 PM

एकीकडे देशात घरांची विक्री घसरत चालली आहे. दुसरीकडे देशातील एका शहराने हा रेकॉर्ड तोडला आहे. या शहराचे नाव बंगळुरु आहे. या शहराने मुंबई आणि पुण्याला देखील मागे टाकले आहे. मुंबई आणि पुण्यात घरांची मागणी सातत्याने घसरत चालली आहे.मात्र दुसरीकडे बंगळुरुचे लोक घरांच्या खरेदी मागे लागले आहेत. अखेर का भारताची ‘सिलीकॉन व्हॅली’चे रिअल ईस्टेट मार्केट इतके तेजीत आहे ?

PropEquity च्या डेटानुसा जेथे भारतातील नऊ प्रमुख शहरातील घरांची मागणीत घसरणी अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर बंगलुरुरातील हाऊसिंग मार्केट मजबूत तेजीच्या मार्गावर आहे. या उसळी मागे मुख्य कारण Genuine End-User Demand आणि शहरातील मजबूत आर्थिक इकोसिस्टीम म्हटले जात आहे. PropEquity च्या डेटानुसार मुंबई आणि पु्ण्यात घरांची मागणी घटल्याने भारताच्या प्रमुख ९ शहरात सप्टेंबरमध्ये समाप्त होणाऱ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत ४ टक्के घसरण होण्याची शक्यता आहे.

सिलिकॉन व्हॅलीत २१ टक्के वाढ

पीटीआयच्या बातमीनुसार भारताची सिलीकॉन व्हॅली म्हटले जाणारे शहर बंगळुरात जुलै- सप्टेंबर तिमाही हाऊसिंग विक्रीत २१ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.या तिमाहीत अंदाजित विक्री १६,८४० युनिट्सपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १३,९६६ युनिट्सच्या तुलनेत ही एक उल्लेखनीय वाढ आहे.

मुंबई आणि पुण्यात आव्हाने

PropEquityच्या आकडेवारीनुसार देशातील प्रमुख ९ शहरातील विक्रीतील ४ टक्के घसरणीचे मुख्य कारण मुंबई आणि पुणे क्षेत्रातील मागणी कमजोर होणे हे आहे. मुंबईतील बाजारात कायमच महागडा राहीला आहे. मुंबईतील घरांच्या किंमती इतक्या जास्त आहेत की सर्वसामन्यांना घरे घेणे कठीण आहे,त्यामुळे केवळ अल्ट्रा-लक्झरी आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये सेल होत असतो.

मध्यम वर्गासाठी चांगले पर्याय

पुण्याचा रिअल इस्टेट बाजार आधी तेजीत होता. परंतू बाजारातील काही अंतर्गत आव्हाने आणि पुरवठ्याचा दबावाने मागणीत अपेक्षित वाढ दिसलेली नाही. या विपरित बंगलुरुत आताही मध्यम उत्पन्नाच्या वर्गासाठी चांगले पर्याय आहेत. त्यामुळे शेवटच्या उपयोगकर्ताच्या मागणीला मजबूती देतात. पारंपारिक रुपाने मुंबई आणि दिल्ली -एनसीआरचे गुंतवणूकदार रिअर इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करत असायचे. परंतू आता ते ‘आयटी हब’च्या दिशेने सरकत आहेत.

भाड्यापेक्षा रिटर्न चांगले

बंगलुरुमध्ये भाड्याचे दर खूप चांगले आहेत.त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी रेंटर इन्कम खूप चांगला ऑप्शन आहे. आयटी कॉरिडॉर आणि नवीन मेट्रो मार्गच्या जवळ मालमत्तेचे दर वेगाने वाढत आहेत. गुंतवणूकदार मानत आहेत की त्यांचे पैसे वाढण्याची शक्यता अधिक आहे.कारण शहराचा विस्तार आता सुरु आहे.

बंगलुरु प्रशासन मेट्रो मार्गिका, पेरिफेरल रिंग रोड (PRR),आणि एअरपोर्ट कनेक्टिव्हीटी सारख्या पायाभूत सुविधेवर मोठी गुंतवणूक करत आहे. नवीन इन्फ्रा प्रोजेक्ट्समुळे शहरातील बाहेरील विभागही मुख्य आयटी हबशी जोडले जात आहे. यामुळे रिअल इस्टेटची मागणी शहराच्या केंद्रातून जास्त स्वस्त विभागात पसरत आहेत. ज्यामुळे विकासाचे चक्र सतत फिरत आहे.