AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Rate Today : आली का आनंदवार्ता, पेट्रोल-डिझेल किती झाले स्वस्त, जाणून घ्या भाव

Petrol Diesel Rate Today : तुमच्या शहरातील पेट्रोल पंपावर लागली का स्वस्ताईची पाटी? आज किती झाले कमी पेट्रोल-डिझेलचा भाव, जाणून घ्या इंधनाचे दर एका क्लिकवर तुम्हाला एका एसएमएसवर किंमती जाणून घेता येईल.

Petrol Diesel Rate Today : आली का आनंदवार्ता, पेट्रोल-डिझेल किती झाले स्वस्त, जाणून घ्या भाव
इंधन झाले का स्वस्त?
| Updated on: Jun 20, 2023 | 8:34 AM
Share

नवी दिल्ली : कच्चा तेलाने (Crude Oil Price) सध्या जागतिक बाजारात उसळी घेतली आहे. बेंच मार्क ब्रेंट क्रूड ऑईल सध्या 76.13 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या आहेत. तर डब्ल्यूटीआय कच्चा तेलात घसरण आली आहे. 71.29 डॉलर प्रति बॅरलवर या किंमती आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी तेल उत्पादन कंपन्या सध्या फायद्यात असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याची शक्यता वर्तवली आहे. तुमच्या शहरातील पेट्रोल पंपावर लागली का स्वस्ताईची पाटी? आज किती झाले कमी पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price), जाणून घ्या इंधनाचे दर एका क्लिकवर तुम्हाला एका एसएमएसवर किंमती जाणून घेता येईल.

सकाळीच भाव केले जाहीर जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम किंमतींवर दिसून येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol Diesel Price) जाहीर केले. कुठे इंधनाचे दर वाढले तर कुठे स्वस्त झाले.

अशी भरते सरकारची तिजोरी एक लिटर पेट्रोलवर केंद्र आणि राज्य सरकारला करातून किती फायदा होतो ते समजू घेऊयात. 18 जून रोजी एखाद्या शहरातील पेट्रोलचा भाव 96.72 रुपये असेल तर त्यात 35.61 रुपये कराचे समाविष्ट असतात. या रक्कमेत 19.90 रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत तर राज्य सरकारच्या तिजोरीत 15.71 रुपये जमा होतात. एक लिटर पेट्रोलवर डिलरला 3.76 रुपये कमिशन मिळते. वाहतूकीसाठी 0.20 पैसा द्यावे लागतात.

प्रति लिटर इतका फायदा देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गेल्या वर्षभरापासून मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.

भाव एका SMS वर

  • भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  • देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  • त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  • पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  • इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  • इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  • बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  • त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  • त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  • एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 105.96 तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.75 पेट्रोल आणि डिझेल 94.21 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.42 आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.45 आणि डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.25 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.03 तर डिझेल 92.58 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.51 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.84 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 105.89 आणि डिझेल 92.39 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 106.63 रुपये तर डिझेल 93.10 रुपये प्रति लिटर

दरात कपात केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.

Follow Us
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती