सोन्यासारखा शेअर, ज्वेलरी कंपनीचा स्टॉक मार्केटमध्ये पैशांचा पाऊस, तुमच्याकडे आहे का हा लंबी रेस का घोडा?

Multibagger Share : बाजारात सोने आणि चांदीने चांगलाच रंग दाखवला आहे. दरवाढीचा बॉम्ब टाकल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. तर शेअर बाजारात गुंतवणूकदारांची या ज्वेलरी कंपनीने मोठी कमाई करून दिली.

सोन्यासारखा शेअर, ज्वेलरी कंपनीचा स्टॉक मार्केटमध्ये पैशांचा पाऊस, तुमच्याकडे आहे का हा लंबी रेस का घोडा?
Updated on: Sep 20, 2025 | 2:03 PM

Multibagger Jewellery Stock : ज्वेलरी विक्री करणारी कंपनी पीसी ज्वेलरच्या शेअरने व्यापारी सत्रात बुधवारी जबरदस्त कामगिरी केली. सध्या सोने आणि चांदीने कहर केला आहे. दोन्ही धातुच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. हा ज्वेलरी स्टॉक सुसाट पळाला आहे. व्यापारी सत्रात हा शेअर जवळपास 15 टक्क्यांपर्यंत उसळला. बाजार बंद होता होता या शेअरने कमाल केली. हा शेअर 9.78 टक्क्यांच्या वाढीसह 14.70 रुपयांवर बंद झाला. पीसी ज्वेलरच्या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. पाच वर्षांत हा शेअर पाच पट वाढला.

संथगतीने सुरुवात, नंतर जोरात धावला

पीसी ज्वेलरचा शेअर आठवड्याच्या तिसऱ्या व्यापारी सत्रात चांगला धावाला. हा स्टॉक सकाळी 13.47 रुपयांवर ओपन झाला होता. पण एका तासानंतर या शेअरने चाल बदलली. तो रॉकेटच्या गतीने धावला. दुपारी हा स्टॉक 14.78 टक्क्यांनी वाढला. तो 15.38 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहचला. बाजार बंद होण्यापूर्वी त्याला थोडा ब्रेक लागला. हा शेअर 14.70 रुपयांवर बंद झाला.

पाच वर्षांत 820.53 टक्के परतावा

तर शुक्रवारी व्यापारी सत्राच्या अखेरीस हा शेअर घसरला. 19 सप्टेंबर रोजी या शेअरमध्ये 6.96 टक्क्यांची घसरण दिसली. त्याच्या उच्चांकी कामगिरीवरून तो बराच घसरला. शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर 13.90 रुपयांवर थांबला. बाजारातील आकडेवारीनुसार या आठवड्यातील 5 व्यापारी सत्रात या शेअरने 5.30 टक्क्यांची उसळी घेतली. तर या एका महिन्यात हा शेअर 6.51 टक्क्यांनी तेजीत आहे. 6 महिन्यात त्यात 3.41 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर गेल्या पाच वर्षांत या शेअरने 820.53 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीचा भाव घसरला आहे. 24 कॅरेट सोने 1,09,780 रुपये, 23 कॅरेट 1,09,340, 22 कॅरेट सोने 1,00,500 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 82,330 रुपये, 14 कॅरेट सोने 64,220 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.सोन्याच्या बाजार भावाप्रमाणेच ज्वेलरी कंपन्याचे शेअर सुद्धा चांगली कामगिरी करत असल्याचे दिसून येते.

डिस्क्लेमर : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. गुंतवणुकीचा सल्ला अजिबात नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञाचे मार्गदर्शन जरूर घ्या.