Gold rate today: सोन्याचा भाव पुन्हा वधारला; चांदीही झळाळली

| Updated on: Jan 06, 2021 | 9:33 AM

जगात कोरोनाच्या साथीने थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले होते. Gold rate

Gold rate today: सोन्याचा भाव पुन्हा वधारला; चांदीही झळाळली
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

जळगाव: राज्यातील सोने-चांदीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या जळगावात दोन्ही धातूंच्या दरात पुन्हा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. सोन्याचा आजचा दर (Gold rate) 53,146 प्रतितोळा आहे. तर चांदीचा दर (Silver rate) प्रति किलो 72,703 रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. (gold silver price today latest updates)

जगात कोरोनाच्या साथीने थैमान घालायला सुरुवात केल्यानंतर सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले होते. मात्र, परिस्थिती निवळत गेल्यानंतर आणि कोरोनावर लस मिळण्याची चिन्हे दिसून लागल्यानंतर सोन्याचा भाव पुन्हा खाली येण्यास सुरुवात झाली होती. भारतात सोन्याच्या किंमतीत ऑगस्ट महिन्यापासून घसरण झाली. ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमत प्रती 10 ग्रॅम चक्क 56 हजार 379 रुपयांवर पोहोचली होती. मात्र, त्यानंतर सोन्याचे दर घसरत गेले.

मात्र, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार आढल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली होती. ही परिस्थिती पाहता 2021च्या दिवाळीपर्यंत सोन्याचा दर प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

सोने गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय

खरं तर, जगातील आर्थिक संकट जेव्हा अधिक गडद झालं, तेव्हा सोन्याने आपला भाव वाढवला. ग्राहक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची निवड करतात. किंमतीत वाढ झाल्याने सोन्यातील गुंतवणुकीची व्याप्ती वाढत आहे. ग्राहक प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी डिजिटल माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत

जळगावातील आजचे दर

सोने – 53,146 प्रति तोळा
चांदी – 72,703 प्रतिकिलो

संबंधित बातम्या:

सोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या ‘या’ 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान

सोन्याचं नेमकं काय होणार? वाढत जाणार की कमी होणार?

…म्हणून आताच करा सोनं खरेदी, दिवाळीपर्यंत बसेल खिशाला कात्री