आता क्रेडिट कार्डच्या प्रत्येक पेमेंटवर मिळवा कॅशबॅक, फक्त करा ‘हे’ काम

| Updated on: Dec 19, 2020 | 2:43 PM

यासाठी तुम्हाला आधी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्ही सहजरित्या क्रेडिड कार्डवर कॅशबॅक मिळवू शकता.

आता क्रेडिट कार्डच्या प्रत्येक पेमेंटवर मिळवा कॅशबॅक, फक्त करा हे काम
एकापेक्षा जास्त कार्ड घेणं योग्य आहे का? - जितके जास्त कार्ड तुम्ही वापराल तितका जास्त खर्च तुम्हाला आहे.
Follow us on

नवी दिल्ली : जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. खरंतर, दरमहा केल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्ड पेमेंटवर कोणताही कॅशबॅक नसतो हे तुम्हाला माहिती आहे. पण आता आम्ही तुम्हाला असा एक मार्ग सांगणार आहोत जिथे तुम्हाला क्रेडिट कार्ड पेमेंटवर कॅशबॅक मिळेल. यासाठी तुम्हाला आधी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्ही सहजरित्या क्रेडिड कार्डवर कॅशबॅक मिळवू शकता. (know how to get cashback on credit card payment know full process)

खरंतर, क्रेडिट कार्ड पेमेंट अ‍ॅप CREDवर प्रत्येक क्रेडिट कार्डवर कॅशबॅक मिळवण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही सहज कार्डाचं पेमेंट CRED द्वारे करू शकता आणि कॅशबॅकसह इतर अनेक ऑफर्सचा आनंद घेऊ शकता. यासाठी आधी तुम्हाला सीआरईडी अ‍ॅप डाउनलोड करणं महत्त्वाचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर त्यामध्ये लॉगिन करा. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, सीआरईडी अ‍ॅप लॉगिन करण्यासाठी थोडा वेळ घेतं, पण त्यानंतर मात्र तुम्ही सहज व्यवहार करू शकता.

कसा मिळेल कॅशबॅक ?

क्रेडिट कार्डवर कॅशबॅक मिळवण्यासाठी आधी तुम्हाला सीआरईडी अॅपमध्ये तुमच्या बँक खात्याशी संबंधित माहितीची पडताळणी करावी लागेल. सगळ्या विशेष म्हणजे प्रत्येक कार्डवर किती पैसे द्यायचे हे अ‍ॅप स्वतःच दाखवतं. त्यानंतर तुम्हीही सहजपणे पेमेंट्स करू शकता. यासाठी, तुम्हाला आधी क्रेडिट कार्डचं पेमेंट करणं आवश्यक आहे. तुम्ही अॅपद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंट करू शकता. असं केल्याने तुम्हाला सीआरईडीकडून काही गुण दिले जातात.

यानंतर तुम्ही मिळवलेल्या या पॉइंट्समधून कोणतीही ऑफर खरेदी करू शकता. ज्यामध्ये तुम्ही ब्रँड डिस्काउंटची ऑफर असेल किंवा अनेक इतर ऑफर्स असतात. तुम्ही यामध्ये अनेक गुण मिळवले तर तशा ऑफर्सही तुम्हाला मिळतात. कॅशबॅकसाठी हेच आहे. हे गुण वापरण्यासाठी तुम्हाला कॅशबॅक कूपन घ्यावं लागतं. जे 1000, 5000 गुणांवर मिळतं.

म्हणजेच समजा जर तुम्ही 6 हजार रुपयांची कूपन घेतली. तर जेव्हा तुम्ही त्याला अॅक्टिव्हेट कराल तेव्हा तुम्हाला कॅशबॅकची संधी आहे. यामध्ये नेमका किती कॅशबॅक मिळेल याबद्दल काही सांगू नाही शकत. पण जर कुपनमध्ये कॅशबॅक मिळाला तर पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये येतील. (know how to get cashback on credit card payment know full process)

संबंधित बातम्या –

मुकेश अंबानींना आतापर्यंतचं सर्वात मोठं यश, अखेर कोरोना काळातच ‘हे’ स्वप्न पूर्ण

फक्त 330 रुपये खर्च करून मिळवा 2 लाख रुपये, जाणून घ्या कसा होणार फायदा?

(know how to get cashback on credit card payment know full process)