AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानींना आतापर्यंतचं सर्वात मोठं यश, अखेर कोरोना काळातच ‘हे’ स्वप्न पूर्ण

उद्योगपती मुकेश अंबानी यांना आतापर्यंतचं सर्वात मोठं यश मिळालं आहे. त्यांच्या काही मोठ्या स्वप्नांपैकी एक स्वप्न असलेली गॅस योजना सुरु झाली आहे.

मुकेश अंबानींना आतापर्यंतचं सर्वात मोठं यश, अखेर कोरोना काळातच 'हे' स्वप्न पूर्ण
Reliance oxygen supplies patients
| Updated on: Dec 18, 2020 | 11:28 PM
Share

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांना आतापर्यंतचं सर्वात मोठं यश मिळालं आहे. त्यांच्या काही मोठ्या स्वप्नांपैकी एक स्वप्न असलेली गॅस योजना सुरु झाली आहे. रिलायंस इंडस्ट्री आणि ब्रिटिश पेट्रोलियमच्या (BP) या बहुचर्चित योजनेविषयी मागील अनेक दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर ही योजना सुरु झाली आहे. आज (18 डिसेंबर) रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि बीपीने काकीनारा किनाऱ्यावरील ब्लॉक केजी डी6 मध्ये आर-क्लस्टर, अल्ट्रा-डीप-वॉटर गॅस क्षेत्रातून गॅस उत्पादनाला सुरुवात केल्याची घोषणा केलीय. ही योजना रिलायंस-बीपीच्या खोल समुद्रातील महत्वकांक्षी तीन योजनांपैकी एक आहे (Reliance BP deal on KG DG 6 Gas Project on finally get startted).

पूर्वेकडील समुद्रातील या योजनांचा वेगाने विकास केला जात आहे. रिलायंस आणि बीपी केजी-डी 6 ब्लॉकमध्ये या 3 गॅस योजना सुरु करत आहेत. आर क्लस्टर, सॅटेलाईट क्लस्टर आणि एमजे अशी या योजनांची नावं आहेत. या तिन्ही योजना 2023 पर्यंत देशाची 15 टक्के गॅसची मागणी पूर्ण करु शकणार आहेत. रिलायंस कंपनी केजी-डी6 ब्लॉकच्या योजनेची मालक आहे. या ब्लॉकमधील योजनेत रिलायंसची भागिदारी 66.67 टक्के आणि उर्वरित 33.33 टक्के भागिदारी बीपीकडे आहे.

मुकेश अंबानी म्हणाले, “बीपी कंपनीसोबत केलेल्या भागिदारीवर आम्हाला अभिमान आहे. दोन्ही कंपनीच्या तज्ज्ञांमुळे आम्हाला या गॅस प्रकल्पाचं काम वेगाने करता येत आहे. ही योजना आव्हानात्मक भौगोलिक ठिकाणी असून तेथे अनेक आव्हानं आहेत. ही योजना देशाच्या ऊर्जा क्षेत्रासाठी मोठं यश आहे. यामुळे भारत स्वच्छ आणि हरित गॅसवर आधारित अर्थव्यवस्थेकडे प्रवास करेल. कृष्णा गोदावरी खोऱ्यात खोल पाण्यातील या योजनेमुळे स्वच्छ उर्जेच्या गरजा पूर्ण करणं शक्य होणार आहे.”

तिन्ही योजनांपैकी आर-क्लस्टर ही पहिली योजना आहे. यात सर्वात आधी गॅस उत्पादन सुरु झालं आहे. हे ठिकाण काकीनारा किनाऱ्याजवळी केजी-डी 6 कंट्रोल अँड रायजर प्लॅटफॉर्मपासून (सीआरपी) जवळपास 60 किलोमीटर दूर आहे. हे ठिकाण पाण्यात 2,000 मीटर खोल आहे. हा आशियातील सर्वात खोल गॅस प्रकल्प आहे. येथे 2021 मध्ये प्रतिदिवस 1.29 कोटी घनमीटर गैस उत्पादन होईल.

हेही वाचा :

मोठी बातमी: राजू शेट्टी मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर मोर्चा काढणार

‘जिओ’चा नवा प्लॅन; देशातील ‘हा’ ग्राहकवर्ग काबीज करण्याची अंबानींची रणनीती

कोरोना काळातही गौतम अदानींनी दिवसाला कमावले 456 कोटी रुपये, मुकेश अंबानी, बिल गेट्स यांनाही मागे टाकलं!

Reliance BP deal on KG DG 6 Gas Project on finally get startted

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....