मोठी बातमी: राजू शेट्टी मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर मोर्चा काढणार

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाईल. | Raju Shetty

मोठी बातमी: राजू शेट्टी मुकेश अंबानींच्या मुंबईतील कार्यालयावर मोर्चा काढणार
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 3:53 PM

पुणे: मोदी सरकारचे कृषी कायदे हे अंबानी (Mukesh Ambani) यांच्यासारख्या उद्योगपतींच्या भल्यासाठी आहेत. मुकेश अंबानी यांची भूक वाढली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांवर नको असलेली विधेयके (Farm laws) लादली जात असल्याचा आरोप खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केला. (Raju Shetty march on Mukesh Ambani office in Mumbai)

राजू शेट्टी यांनी बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर 22 तारखेला मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाईल. या मोर्चात बच्चू कडू आणि बाबा आढाव यांच्या संघटनांचाही सहभाग असणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.

मोदी सरकारने शेतकऱ्यांवर कृषी कायदे जबरदस्तीने लादले

शेतकऱ्यांनी ज्या कायद्यांची मागणीच केली नाही ते कायदे शेतकऱ्यांवर लादण्यात आले. सरकारला शेतकऱ्यांना काही द्यायचंच असेल तर हमीभाव द्या. दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. यावरून शेतकऱ्यांच्या मागण्या सर्वोच्च न्यायालयाला मान्य असल्याचे दिसत आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी संघटना एकत्र असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा 21 वा दिवस

दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. आज या आंदोलनाचा 21 वा दिवस आहे. दिल्लीच्या सीमेवरून शेतकऱ्यांना हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली. या नोटीसवर आता केंद्र सरकार काय स्पष्टीकरण देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.

संबंधित बातम्या:

‘कृषी कायद्यांसारख्या कठोर सुधारणा रेटण्यासाठीच जनतेने मोदींना बहुमत दिलेय’

नारी शक्तीने शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली, 2000 पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- गडकरी

(Raju Shetty march on Mukesh Ambani office in Mumbai)

Non Stop LIVE Update
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.