नारी शक्तीने शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली, 2000 पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग

नारी शक्तीने शेतकरी आंदोलनाची ताकद वाढली, 2000 पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांचा सहभाग

आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ताकद देण्यासाठी 2 हजारपेक्षा अधिक महिला शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Dec 16, 2020 | 12:44 AM

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीसह देशभरामध्ये आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारसोबत शेतकरी संघटनांच्या 5 बैठका झाल्या. मात्र, यामध्ये तोडगा निघाला नाही. यानंतर आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ताकद देण्यासाठी 2 हजारपेक्षा अधिक महिला शेतकरी या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये महिला शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याने आंदोलनाची ताकद वाढताना पाहायला मिळत आहे. कायदा रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका महिला शेतकऱ्यांनी घेतली आहे (More than 2 thousands of Women farmer join Farmer Protest in Delhi).

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 2 हजारापेक्षा जास्त महिला सहभाग घेण्यासाठी दिल्ली जवळच्या सीमारेषेवर आल्या आहेत. यामध्ये सिंधू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, पलवल बॉर्डर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला शेतकऱ्यांसोबत आंदोलनाला बसल्या आहेत. त्यांच्याकडून आंदोलकांना जेवणाची व्यवस्था करण्यातही मदत केली जात आहे.

सिंधू बॉर्डर येथील आंदोलनामध्ये महिलांनी कृषी कायद्याविरोधातील लढाईत थेट दंड थोपटले आहेत. केंद्र सरकार जोपर्यंत कायदा परत घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहिल आहे, असं मत पंजाबच्या महिला शेतकरी व्यक्त करत आहेत. पटियालाच्या महिला शेतकरी परमिंदर आणि भटिंडाच्या महिला शेतकरी गुमनाम यांनी आंदोलकांच्या वतीने भूमिका मांडली.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग झाला आहे. नारी शक्तीमुळे आता आंदोलनाला भक्कम ताकद मिळेल असं मत राष्ट्रीय किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पुरुष आणि महिलांचा सहभाग मोठा आहे. सरकार जोपर्यंत निर्णय मागे घेणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा विश्वास आंदोलक शेतकरी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे मारता, मग देशात घोषित आणीबाणी आहे का? : उद्धव ठाकरे

नव्या कृषी कायद्यांचा उद्योगपतींनाच जास्त फायदा, जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ज्ञांची भूमिका

शेतकऱ्यांच्या खांद्यावर विरोधी पक्षांची बंदूक : पंतप्रधान मोदी

व्हिडीओ पाहा :

More than 2 thousands of Women farmer join Farmer Protest in Delhi

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें