Gold : अवघ्या एका रुपयात खरेदी करा सोने, पटापट जाणून घ्या कुठे करु शकता स्वस्तात खरेदी..

| Updated on: Oct 19, 2022 | 6:03 PM

Gold : अवघ्या रुपयात तुम्हाला सोने खरेदी करता येणार आहे..कसे ते पाहुयात..

Gold : अवघ्या एका रुपयात खरेदी करा सोने, पटापट जाणून घ्या कुठे करु शकता स्वस्तात खरेदी..
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली: भारतीयांचे सुवर्णप्रेम जगजाहीर आहे. आजही भारतात सोन्यात (Gold) केलेली गुंतवणूक (Investment) सर्वात सुरक्षित मानण्यात येते. जर तुम्हाला ही दिवाळीच्या (Diwali) मुहुर्तावर सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर ही सुवर्णसंधी (Golden Opportunity) सोडू नका. तुम्हाला अवघ्या एका रुपयात सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी मिळत आहे.

या धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विचार करत असाल तर ही गोल्डन संधी तुमच्यासाठीच आहे. आजकाल सोन्याचे भाव (Gold Price)एवढे वाढले आहेत की, सर्वसामान्य लोकांना सोने खरेदी करणे अवाक्याबाहेर गेले आहे. अशावेळी एका रुपयात सोने खरेदीचा हा सुवर्णयोग साधून घ्या..

आजकल परंपरागत गुंतवणुकीपेक्षा इतरही अनेक प्रकारे तुम्ही सोन्यात गुंतवणूक (Investment in Gold) करु शकता. थेट सोने खरेदी पेक्षा डिजिटल गोल्डमध्ये (Digital Gold) गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.

हे सुद्धा वाचा

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक तीन प्रकारे करता येते. या तीन प्रकारे तुम्ही सोन्यात गुंतवणूक करु शकता. यामध्ये गोल्ड ईटीएफ (Gold ETF), गोल्ड बाँड (Gold Bond) आणि गोल्ड फंड (Gold Fund) यांचा समावेश होतो.

डिजिटल सोन्यात गुंतवणूक करणे म्हणजे 24 कॅरेट सोन्यात (24 Carat Gold) गुंतवणूक करण्याचा व्हर्च्युअल पर्याय आहे. या व्हर्च्युअल पर्यायामुळे तुम्हाला ऑनलाईन सहजरित्या सोन्यात गुंतवणूक करता येणार आहे.

तुम्हाला दिवाळी आणि धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यासाठी सराफा गल्ली तुडवायची आणि गर्दीत दागिने सांभाळण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या सोने खरेदी करु शकता आणि विक्रीही करु शकता. त्यासाठी बाजारात जाण्याची आवश्यकता नाही.

सध्या अनेक अॅप्स डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीची संधी देत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अथवा युपीआयच्या माध्यमातून डिजिटल सोन्यात तुम्हाला गुंतवणूक करता येणार आहे. या व्यवहाराची ऑनलाईन पावतीही तुम्हाला प्राप्त होते.

या सोने खरेदीची सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्हाला अगदी 1 रुपयातही डिजिटल सोने खरेदी करता येते. काही प्लॅटफॉर्म्सवर तुम्हाला 2 लाखांपर्यंत डिजिटल सोने खरेदी करण्याची सुविधा मिळते. त्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अथवा ट्रेडिंग खाते असण्याची आवश्यकता नाही.