आधार कार्डला पॅन लिंक केलात का? नाहीतर द्यावा लागेल 10 हजाराचा दंड, डेडलाईन संपतेय!

| Updated on: Dec 12, 2020 | 2:37 PM

पॅनकार्ड (Pan Card) आधार कार्डशी जोडलेलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचंही पॅनकार्ड आधार कार्डशी (Aadhar Card) जोडलेलं आहे का?

आधार कार्डला पॅन लिंक केलात का? नाहीतर द्यावा लागेल 10 हजाराचा दंड, डेडलाईन संपतेय!
विविध 12 भाषांमध्ये मोबाईल App - या Appसाठी भाषेची काही अडचण नाही. कारण देशातील विविध 12 भाषांमध्ये हे App उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. त्यात इंग्रजी भाषेचा समावेश तर आहेच.
Follow us on

नवी दिल्ली : पॅन (PAN) म्हणजे कायमस्वरूपी खातं क्रमांक म्हणजेच स्थायी खाते क्रमांक. सध्याच्या सगळ्या आर्थिक आणि बँकेशी निगडिक व्यवयायामध्ये पॅनकार्ड महत्त्वाचं असतं. मग ते एखाद्या बँकेत खातं उघडण्याचं काम असो किंवा व्यवसाय सुरू करण्यापर्यंत पॅनकार्ड सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे. PAN नंबरद्वारे केलेले आर्थिक व्यवहार वैध मानले जातात. अनेक यामुळे मोठी फसवणूकही टाळता येते. पॅनकार्डच्या वापरामुळे भविष्यात कायदेशीर अडचणीत येण्याची शक्यता कमी असते. पण या सगळ्यात पॅनकार्ड (Pan Card) आधार कार्डशी जोडलेलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचंही पॅनकार्ड आधार कार्डशी (Aadhar Card) जोडलेलं आहे का? (link pan card to aadhaar before 31 march 2021 or penalty 10000 by income tax act how to pan aadhaar link process online)

केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार पॅनकार्ड आधारशी जोडणं (Pan Aadhaar link) बंधनकारक असणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या कामासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जर शेवटच्या तारखेपर्यंत कार्ड लिंक झालं नाही तर तुम्हाला 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. यामुळे तुम्हीही जर पॅनकार्ड आधारशी लिंक केलं नसेल तर तातडीने ती प्रक्रिया पूर्ण करा.

पॅनकार्ड होऊ शकतं बाद किंवा आकारला जाऊ शकतो दंड

पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बाद ठरते. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2021 नंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड जर तुम्ही वापरले तर प्राप्तिकर कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे जर करदात्यांनी 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बाद होऊ शकतं.

पॅनकार्ड रद्द झालं तर काय अडचणी येतील?

जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.

– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा. (link pan card to aadhaar before 31 march 2021 or penalty 10000 by income tax act how to pan aadhaar link process online)

इतर बातम्या –

सोन्याच्या दराचा शत्रू कोण? का घसरतोय सातत्यानं भाव?

फक्त 250 रुपयांच्या गुंतवणुकीवर मुलीच्या भविष्याची चिंता सोडा, टॅक्स बचतीसोबत ‘हे’ आहे फायदे

(link pan card to aadhaar before 31 march 2021 or penalty 10000 by income tax act how to pan aadhaar link process online)