LPG Gas Cylinder Price: दिलासादायक! महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या नवे दर

| Updated on: Sep 01, 2022 | 8:12 AM

महागाई सर्वोच्च स्थराला पोहोचलेली असताना महिन्याचा पहिल्याच दिवशी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या दरात कपात करण्यात आली आहे.

LPG Gas Cylinder Price: दिलासादायक! महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या नवे दर
Follow us on

नवी दिल्ली: महागाई सर्वोच्च स्थराला पोहोचलेली असताना महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या दरात (LPG Gas Cylinder Price) कपात करण्यात आली आहे. एलपीजी गॅसचे (LPG Gas) दर प्रति सिलिंडर (Cylinder) 100 रुपयांनी कमी झाले आहेत. मात्र ही कपात केवळ व्यवसायिक गॅस सिलिंडरच्याच दरात करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्याच्या किमती स्थिर आहेत.

गॅस सिलिंडरचे नवे दर

व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर जवळपास 100 रुपयांची कपात करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता राजधानी दिल्लीमध्ये एलपीजी गॅसचा दर प्रति सिलिंडर 1885 एवढा झाला आहे. तो पूर्वी 1976.50 रुपये एवढा होता. कोलकातामध्ये घसरणीनंतर गॅस सिलिंडरचे दर 1995.5 रुपयांवर पोहोचले आहेत. पूर्वी ते 2095 रुपये इतके होते. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये नव्या दरानुसार एका व्यवसायिक गॅस सिलिंडरसाठी आता 1844 रुपये मोजावे लागणार आहेत.

ऑगस्टमध्येही कमी झाले होते भाव

व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरामध्ये कपात होण्याचा हा सलग दुसरा महिना आहे. यापू्र्वी ऑगस्टमध्ये देखील एलपीजी गॅसच्या दरात 36 रुपयांची कपात करण्यात आली होती. तर आज पुन्हा एकदा व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर 100 रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

हॉटेलमधील जेवण स्वस्त होणार?

सिलिंडरच्या दरात वाढ सुरूच असल्याने हॉटेल व्यवसायिकांनी अन्नपदार्थांचे दर देखील वाढवले होते. मात्र आता सलग दोन महिने गॅस सिलिंडरच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे हॉटेलमधील जेवणाचे दर कमी होऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पेट्रोल डिझेलचे दर स्थिर

दरम्यान दुसरीकडे राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर आज देखील स्थिर आहेत. दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र दुसरीकडे सीएनजी, पीएनजीच्या दरात वाढ होताना दिसत आहे.  आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.