किसान सम्मान निधीचा सातवा हप्ता जारी, कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा

केंद्र सरकारने पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी सातवा हप्ता जारी केला आहे (Modi Government released 7th installment of pm kisan samman nidhi scheme)

किसान सम्मान निधीचा सातवा हप्ता जारी, कोट्यवधी शेतकऱ्यांना फायदा
दरम्यान, दुर्दैवाने तुमच्यासोबत काही घडलं तर तुमच्या कुटुंबाला जोखीम संरक्षण म्हणून 2 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर 4 लाख रुपयांचा अपघाती विमा कव्हरदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे कमी पैशांच्या बचतीमध्येही तुम्ही चांगला नफा कमवू शकता अशी ही योजना आहे.
| Updated on: Dec 19, 2020 | 3:41 PM

नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी सातवा हप्ता जारी केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून देशातील कोट्यवधी शेतकरी या हप्त्याची वाट बघत होते. अखेर त्यांना लवकरच सातव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत (Modi Government released 7th installment of pm kisan samman nidhi scheme).

किसान सम्मान निधी योजनेशी तुमचं नाव जोडलं गेलं असेल तर तुम्ही आपल्या अकाउंटमध्ये याबाबतचा तपशील पाहू शकता. पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे वर्षभरात तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळतात. मात्र, यावेळी केंद्र सरकारकडून पैसे देण्यास थोडा उशिर झाला.

आपल्या खात्यात पैसे आले का हे कसं तपासावं?

पीएम किसान सम्मान निधी अंतर्गत आपल्या बँक खात्यात पैसे आले का हे तुम्ही सहजपणे तपासू शकता. यासाठी तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील….

  • सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
  • तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सम्मान निधीचं होमपेज दिसेल.
  • होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
  • तिथे स्टेटसच्या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर तिथे दिलेल्या रकान्यात अकाउंट नंबर, आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका.
  • त्यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती स्क्रिनवर वाचायला मिळेल (Modi Government released 7th installment of pm kisan samman nidhi scheme)

हेही वाचा : काँग्रेसच्या अध्यक्षपदी जवळपास राहुल गांधीच निश्चित; सोनियांच्या बैठकीतून मोठा निर्णय?